- Home
- lifestyle
- Fatty Liver Diet Plan: तुमचं लिव्हर 'फॅटी' झालंय?, डॉक्टरांना न विचारता करा हे ७ साधे उपाय!; धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टी ताबडतोब थांबवा
Fatty Liver Diet Plan: तुमचं लिव्हर 'फॅटी' झालंय?, डॉक्टरांना न विचारता करा हे ७ साधे उपाय!; धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टी ताबडतोब थांबवा
Fatty Liver Diet Plan: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये (यकृत) अतिरिक्त चरबी जमा होणे. ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे.

फॅटी लिव्हरचा आजार दूर करण्यासाठी हे उपाय करा
फॅटी लिव्हरचा आजार दूर करण्यासाठी काय करायला हवं, ते जाणून घेऊया.
आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा
फायबर, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा त्रास कमी होतो. यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, नट्स, ऑलिव्ह ऑईल, फॅटी फिश यांचा आहारात समावेश करा.
रेड मीट खाणे टाळा
रेड मीटमधील चरबी लिव्हरमध्ये जमा होऊ शकते. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्यासाठी रेड मीट जास्त खाऊ नका. तसेच प्रक्रिया केलेले मांस, जंक फूडसारखे पदार्थही खाणे टाळा.
सोडा पिणे टाळा
सोड्यासारखी गोड शीतपेये लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगली नाहीत. त्यामुळे त्यांचे सेवन करणे टाळा किंवा कमी करा.
साखर आणि कार्ब्स टाळा
साखर आणि कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ तुमच्या आहारातून काढून टाका.
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा
शरीराचे वजन वाढू देऊ नका. जास्त वजन असलेल्या लोकांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा.
मद्यपान करणे टाळा
लिव्हरच्या चांगल्या आरोग्यासाठी मद्यपान पूर्णपणे बंद करणे महत्त्वाचे आहे.
व्यायाम, योग आणि पुरेशी झोप
नियमित व्यायाम आणि योगा करा. तसेच, रात्री ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

