ॲसिडिटीची समस्या आहे? या घरगुती उपायांनी करा सुटका!

| Published : Jan 14 2025, 12:32 PM IST

Jaggery

सार

हिवाळ्यात गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचन सुधारते, गॅस आणि ऍसिडिटी कमी होते. हे मिश्रण शरीर डिटॉक्स करण्यास आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते.

आरोग्य तज्ज्ञ अनेकदा हिवाळ्यात गूळ खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्यास तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते? जर तुम्ही दररोज रात्री जेवणानंतर गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ले, तर तुमच्या एकूण आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हिवाळ्यात बऱ्याच वेळा लोकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही. जर तुम्ही अशा समस्यांचा सामना करत असाल, तर रात्रीच्या जेवणानंतर गूळ आणि बडीशेप खाणे सुरू करावे. गूळ आणि बडीशेप तुमच्या आतड्यांच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करू शकतात. गॅस आणि ऍसिडिटीसारख्या पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीसुद्धा गूळ आणि बडीशेप खाणे उपयोगी ठरते.

आणखी वाचा- पोटावरची चरबी करा महिन्यात कमी, करून पहा 'हे' उपाय

जिऱ्याचं पाणी ठरेल उपयोगी

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही ऍसिडिटीची समस्या दूर करू शकता. जिऱ्यात नैसर्गिक तेल असतं, जे तुमच्या लाळग्रंथीला उत्तेजित करतं आणि पचन सुधारतं. दोन कप पाण्यात एक चमचा जिऱं सुमारे १० मिनिटं उकळा. त्यानंतर पाणी थंड होऊ द्या, गाळून घ्या आणि जेवणानंतर दोन ते तीन वेळा प्या. यामुळे गॅसच्या त्रासातही आराम मिळतो.

पोटासाठी फायदेशीर दही

प्रोटीन आणि कॅल्शियमने भरपूर दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे पचन सुधारण्याचं काम करतात. रोजच्या आहारात थोडं दही समाविष्ट करा, ज्यामुळे ऍसिडिटीची समस्या कमी होईल.

आणखी वाचा-  फिट, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा ही 3 योगासने, वाचा फायदे

शरीराला करा डिटॉक्सिफाय

गूळ आणि बडीशेपचं मिश्रण शरीर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. श्वासाची दुर्गंधी ही अनेकदा लोकांसाठी लाजिरवाणी ठरते. जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती हवी असेल, तर नियमितपणे गूळ आणि बडीशेप एकत्र खाण्याची सवय लावा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या