सार
प्राचीन काळापासूनच योगाभ्यास करणे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिरात उर्जा टिकून राहते. अशातच स्वत:ला मानसिक आणि शारिरीक रुपात फिट ठेवण्यासाठी यंदाच्या वर्षात काही सोपे योगासने करू शकता.
3 Yoga Pose for Mental Health and Fitness : योगाभ्यासाचे फायदे सर्वांनाच माहिती आहे. योगा एक प्राचीन अभ्यास आहे. सध्या संपूर्ण जगभरात योगाभ्यासाच्या माध्यमातून बहुतांशजण हेल्दी आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतात. यामुळे केवळ वजनच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारले जाते. याशिवाय दररोज योगाभ्यास केल्याने अंग दुखी ते आरोग्यासंबंधित काही समस्या दूर राहण्यास मदत होते. अशातच फिट आणि मानसिक आरोग्यासाठी कोणते योगासने करावीत याबद्दल पुढे जाणून घेऊया.
बालासन
दररोज तुम्ही बालासन करु शकता. याला इंग्रजीमध्ये चाइल्ड पोज असे म्हटले जाते. बालासन केल्याने शरीर आणि मन रिलॅक्स राहण्यास मदत होते. याशिवाय अन्य समस्याही दूर राहतात.
बालासन करण्याचे फायदे
- बालासन केल्याने मेंदू शांत राहतो आणि राग कमी येतो.
- डोकेदुखीची समस्या कमी होते.
- कंबर, पाठ दुखीच्या समस्येमध्ये बालासन करणे फायदेशीर ठरू शकते.
- स्नायूंचे दुखणे आणि सांधे दुखत असल्यास बालासन करू शकता.
भुजंगासन
भुजंगासन केल्याने स्नायू मजबूत होण्यासह बॉडी पोश्चर व्यवस्थितीत राहण्यास मदत होते. याशिवाय थकवा, तणाव दूर होण्यासह बद्धकोष्ठता, अॅसिडीटीची समस्याही कमी होते.
भुजंगासन करण्याचे फायदे
- भुजंगासन केल्याने श्वास घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होते.
- महिला आणि पुरुषांमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी भुजंगासन करणे फायदेशीर ठरू शकते.
- भुजंगासन केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो.
- पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी होण्यास मदत होते.
वीरभद्रासन
वीरभद्रासन एक शक्तीशाली योगा पोज आहे. याला इंग्रजीमध्ये वॉरियर पोज असे म्हटले जाते. वीरभद्रासन केल्याने अंग दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
वीरभद्रासन करण्याचे फायदे
- वीरभद्रासन केल्याने शरिराचा तोल सुधारण्यासह उर्जा वाढण्यास मदत होते.
- वजन कमी करण्यासाठी वीरभद्रासन करू शकता.
- तणाव आणि एंग्जायटीची समस्या वीरभद्रासन केल्याने कमी होते.
- आत्मविश्वास वाढला जातो.
आणखी वाचा :