सार

घरी राहिलेल्या शिळ्या भातापासून फोडणीचा भात हमखास तयार केला जातो. पण शिळ्या भाताच्या वेगवेगळ्या रेसिपी देखील तयार केल्या जाऊ शकतात. पाहूया शिळ्या भातापासून तयार होणाऱ्या दोन चमचमीत पदार्थांची रेसिपी आणि कृती...

Rice easy recipes : शिळ्या भातापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार होऊ शकतात. पण झटपट आणि पोटभरेल अशा भाताच्या दोन रेसिपी पाहणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर पाहूया....

रेसिपी 1 : टोमॅटो राईस

साहित्य

शिळा भात ,अर्धा टिस्पून हळद ,एक चमचा हिंग,एक चमचा जिरे,एक बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो.

कृती

टोमॅटो राईस दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. टोमॅटो राईस तयार करण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो प्युरी तयार करू घ्या. कढई गॅसवर गरम करत ठेवून त्यामध्ये तेल घाला. तेलात जिरे, हळद, हिंग टाकून फोडणी तयार करून घ्या. फोडणीमध्ये कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरची देखील घाला. यानंतर टोमॅटोटी प्युरी घालून भात परतून घेतल्यानंतर वरुन चवीनुसार मीठ घाला. भातावर पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गॅस बंद करुन भातावरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम खाण्यासाठी एका प्लेटमध्ये सर्व्ह करा.

व्हेज पुलाव

साहित्य

शिळा भात, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा,पावभाजी मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो, फ्लॉवर, बटाटे, गाजर, हिरव्या मिरची, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ.

कृती

शिळ्या भातापासून खमंग असा व्हेज पुलाव तयार करू शकता. यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर कांदा, मिरची घालून व्यवस्थितीत भाजून घ्या. कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये आलं-लसूणची पेस्ट घालून परतून घ्या. यामध्ये टोमॅटो घालून थोडे शिजवून घ्या. टोमॅटो शिजल्यानंतर भातासाठी घेतलेल्या भाज्या घाला. मिश्रणात पावभाजी मसाला घालून त्यामध्ये अर्धा चमचा दही देखील घाला. कढईवर झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्या. भाज्या वाफवल्यानंतर त्यामध्ये शिळा भात, चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत परतून घ्या. पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांनी गॅस बंद करा. आता गरमागरम व्हेज पुलाव खाण्यासाठी सर्व्ह करा.

आणखी वाचा : 

थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर येईल ग्लो, नारळाच्या तेलात मिक्स करा या 3 वस्तू

भात किंवा इडलीसोबत खाण्यासाठी इन्स्टंट सांबर, वाचा रेसिपी स्टेप बाय स्टेप