सार
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. कोरड्या त्वचेच्या समस्येवर नारळाच्या तेलाचा बहुतांशजण वापर करतात.
Winter skin care tips : थंडीच्या दिवसात त्वचेमधील ओलसरपणा कमी होते. यामुळे चेहरा डल आणि काळवंडलेला दिसू लागतो. खरंतर, थंडीत चेहरा डल दिसणे सामान्य बाब असून त्या समस्येवर उपाय म्हणून मॉइश्चराइजर लावले जाते. थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे असते. त्वचेमधील कोरडेपणा अधिक वाढल्यास त्वचेवर लाल चट्टे, खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे वेळीच स्किन केअर रुटीन फॉलो करणे महत्वाचे आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो.
घरच्याघरी थंडीच्या दिवसात स्किन केअर करण्यासाठी काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करू शकता. कोरड्या त्वचेच्या समस्येवर नारळाचे तेल वापरू शकता. नारळाच्या तेलात काही वस्तू मिक्स करुन त्यापासून फेस पॅक तयार करू शकता. यामुळे थंडीतही चेहऱ्यावरील ग्लो टिकून राहण्यास मदत होईल.
नारळाचे तेल आणि मध
नारळाचे तेल आणि मध त्वचेसह केसांसाठी फायदेशीर असते. नारळाचे तेल त्वचेला हाइड्रेट आणि मॉइश्चराइजर करण्यास मदत करतात. याशिवाय मधातील अँटीऑक्सिडेंट गुणधर्म डॅमेज स्किनसाठी फायदेशीर ठरते. एक चमचा नारळाचे तेल आणि एक चमचा मध मिक्स करुन फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला 10 मिनिटे लावून पाण्याने स्वच्छ धुवा.
नारळाचे तेल आणि कोरडफ
कोरफडचे जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यासह त्वचेवर होणारी जळजळ कमी करते. थंडीत चेहऱ्यावरील ग्लो टिकून राहण्याासाठी घरच्याघरीच नारळाचे तेल आणि कोरफडचे जेल मिक्स करुन फेस पॅक तयार करू शकता.
नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल
नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्रित मिक्स करुन चेहऱ्याला लावल्यास त्वचेला ग्लो येतो. याशिवाय त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई त्वचेला मऊसर आणि मॉइश्चराइज करण्यास मदत करते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :