सार
Instant Sambar Recipe : इडली सांबर बहुतांशजण आवडीने खातात. खरंतर, सांबर वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाते. पण भात किंवा इडलीसोबत खाण्यासाठी स्वादिष्ट सांबर कसे तयार करायचे याची कृती सविस्तर पाहूया...
Instant Sambar Recipe in Marathi : दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये इडली, वडा किंवा डोसाचे सर्वाधिक सेवन केले जाते. या सर्व पदार्थांसोबत खास पद्धतीचे सांबार दिले जाते. यामुळे पदार्थाची चव अधिक वाढली जाते. अशातच घरच्याघरी रेस्टॉरंट स्टाइल भात किंवा इडलीसोबत सेवन करण्यासाठी स्वादिष्ट असे सांबर कसे तयार करायचे याची रेसिपी पाहूया...
साहित्य
- 1/2 कप तूरडाळ
- कांदा
- 2 टोमॅटो
- 1 गाजर
- 1 वांग
- भोपळा
- 2 टिस्पून सांबर मसाला
- अर्धा टिस्पून हळद
- 1 टिस्पून मोहरी
- 3 सुक्या मिरची
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- तेल
- मीठ चवीनुसार
कृती
- सर्वप्रथम कुकरमध्ये तूरडाळ स्वच्छ धुवून घ्या. यामध्ये मीठ, हळद आणि पाणी मिक्स करा. मिक्सरला तीन शिट्ट्या द्या.
- सर्व भाज्या बारीक आकारामध्ये कापून घ्या
- शिजवलेल्या डाळीमध्ये कांदा, टोमॅटो, लाल भोपळा, गाजर, वांगी घालून गरम पाणी घाला. पुन्हा एकदा कुकरची एक शिट्टी काढा.
- फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करुन मोहरी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरची घाला.
- कढईमध्ये सांबरसाठी तयार केलेले मिश्रण घालून त्यामध्ये मीठ टाका. यानंतर सांबरवरुन तयार केलेली फोडणी घाला. गॅस बंद करून तयार झालेले गरमागरम सांबर भात किंवा इडलीसोबत खायला द्या.
आणखी वाचा :
चब्बी तरुणींसाठी परफेक्ट Anshula Kapoor सारखे 8 लेहेंगे, दिसाल कातिल
थंडीत गरम पाण्याने आंघोळ करावी का? उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी टाळा ही चूक