MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Sink Clog : सिंक चोक झालंय? प्लंबरला बोलवण्याआधी हा सोपा उपाय करून बघा

Kitchen Sink Clog : सिंक चोक झालंय? प्लंबरला बोलवण्याआधी हा सोपा उपाय करून बघा

तुमच्या किचन सिंकमध्ये पाणी साचलंय आणि चोक झालंय का? लगेच प्लंबरला बोलवायची गरज नाही. घरातल्याच वस्तू वापरून तुम्ही छोटा-मोठा चोकअप सहज काढू शकता. हे सोपे उपाय नक्की करून बघा.

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 15 2026, 11:11 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
किचन सिंक चोक झालंय..
Image Credit : stockPhoto

किचन सिंक चोक झालंय..

मुंबई : किचन सिंकमध्ये पाणी साचणं ही एक मोठी डोकेदुखी असते. अन्नाचे कण, तेल आणि इतर चिकट पदार्थांमुळे पाईप ब्लॉक होतो. प्लंबरला बोलवण्याआधी काही सोपे घरगुती उपाय आहेत. आधी सिंकमधला कचरा हाताने काढा. त्यानंतर गरम पाणी ओतून बघा. गरम पाण्यामुळे तेलकट थर निघून जातो. पण PVC पाईपमध्ये जास्त उकळतं पाणी ओतू नका, त्याने पाईप खराब होऊ शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
प्लंगर असेल तर अजून सोपं
Image Credit : Gemini

प्लंगर असेल तर अजून सोपं

घरात सिंक प्लंगर असेल तर छोटा चोकअप काढणं खूप सोपं होतं. आधी सिंकमध्ये थोडं पाणी राहू द्या. ड्रेनवर प्लंगर ठेवून जोरात वर-खाली दाबा. यामुळे दाब तयार होऊन कचरा पुढे ढकलला जातो. सोशल मीडियावर बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा उपाय खूप प्रसिद्ध आहे, पण तो प्रत्येक वेळी यशस्वी होतोच असं नाही.

Related Articles

Related image1
Tap Cleaning : फक्त ब्रश फिरवा अन् नळावरचा गंज आणि क्षारांचे डाग गायब करा!
34
ही एक चूक कधीच करू नका!
Image Credit : Gemini

ही एक चूक कधीच करू नका!

सिंक साफ करण्यासाठी कधीही दोन वेगवेगळे केमिकल ड्रेन क्लीनर एकत्र वापरू नका. त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन विषारी वायू तयार होऊ शकतो, जो आरोग्यासाठी धोकादायक असतो. घरगुती उपाय करूनही पाणी जात नसेल, दुर्गंध येत असेल किंवा पाणी उलटं वर येत असेल, तर मात्र लगेच प्लंबरला बोलवा. याचा अर्थ ब्लॉकेज मोठा आहे.
44
सिंक ब्लॉक होऊ नये म्हणून काय करावं?
Image Credit : Gemini

सिंक ब्लॉक होऊ नये म्हणून काय करावं?

सिंकमध्ये नेहमी ड्रेन फिल्टर (जाळी) वापरा, म्हणजे अन्नाचे कण पाईपमध्ये अडकणार नाहीत. उरलेलं तेल किंवा तूप सिंकमध्ये ओतण्याऐवजी ते वेगळं जमा करून फेकून द्या. छोटे-मोठे ब्लॉक तुम्ही घरगुती उपायांनी काढू शकता, पण अडचण मोठी असेल तर तज्ज्ञांची मदत घेणंच कधीही चांगलं.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Oven Cooking : ओव्हनमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होतो का? अशी घ्या काळजी!
Recommended image2
Bathroom Cleaning Tips : 10 मिनिटांची जादू, बाथरुमच्या टाईल्सवरील डाग काढण्याच्या भन्नाट टिप्स
Recommended image3
Potato Cooking Tips : बटाटे लवकर शिजवायचेत? कुकरमध्ये हा छोटासा बदल करून पाहा
Recommended image4
Cancer Causing Household Items : रोजच्या वापरातील या 6 वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका
Recommended image5
1 Gram Gold Rings : 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, डिझाइन्स पाहाच
Related Stories
Recommended image1
Tap Cleaning : फक्त ब्रश फिरवा अन् नळावरचा गंज आणि क्षारांचे डाग गायब करा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved