Heart Attack Symptoms : महिलांमधील हार्ट अटॅक! ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका
हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपलं शरीर अनेकदा काही पूर्वसूचना देत असतं. ही लक्षणे वेळीच ओळखली, तर हृदयाला मोठ्या धोक्यापासून सहज वाचवता येतं.

हार्ट अटॅकच्या एक महिना आधीपासून शरीरात विविध त्रास
हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही धोक्याचे इशारे देतं. ही लक्षणे वेळीच ओळखली तर जीव वाचू शकतो. एका ताज्या संशोधनानुसार, ९५ टक्के महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधीपासूनच शरीरात विविध प्रकारचे त्रास जाणवू लागतात.

हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण
स्त्री असो वा पुरुष, छातीत दुखणे हे हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण आहे. पण महिलांच्या बाबतीत ही लक्षणे पुरुषांपेक्षा थोडी वेगळी असू शकतात. त्यामुळे छातीत दुखण्याव्यतिरिक्त इतर लक्षणांवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
हार्ट अटॅकची आणखी काही लक्षणे
'हार्वर्ड हेल्थ'च्या एका सर्वेक्षणानुसार, केवळ छातीत दुखणेच नाही, तर हार्ट अटॅकची इतरही काही लक्षणे आहेत. रात्री झोप न येणे, खूप थकवा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही देखील हार्ट अटॅकची मोठी लक्षणे आहेत. वेळीच उपचार सुरू केल्यास धोका टळू शकतो.
भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयाच्या समस्या अधिक
'एनएसओ हेल्थ सर्व्हे २०२५' च्या अहवालानुसार, भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयाच्या समस्या अधिक आढळतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण १३.५% (लाखामागे १३,५०४) आहे, तर महिलांमध्ये ते १७% (लाखामागे १७,००६) आहे. महिलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात, ते जाणून घेऊया.
महिलांना असामान्य थकवा जाणवू शकतो
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस किंवा आठवडाभर आधी महिलांना खूप थकवा जाणवू शकतो. काम करताना किंवा विश्रांती घेताना श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ, अपचन, चक्कर येणे किंवा थंड घाम येणे यांसारख्या समस्या दिसू शकतात. याशिवाय विनाकारण चिंता किंवा मोठं संकट येणार असल्याची भीती वाटू शकते.
हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी असतात
महिला आणि पुरुषांच्या शारीरिक रचनेतील फरकामुळे हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी असतात. महिलांच्या कोरोनरी धमन्या आकाराने लहान असल्याने तिथे ब्लॉक शोधणे कठीण जाते. याशिवाय हार्मोन्सची भूमिकाही मोठी असते. इस्ट्रोजेन हार्मोन हृदयाला निरोगी ठेवतं, पण मेनोपॉजनंतर त्याची पातळी कमी झाल्याने महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो.
हार्ट अटॅक टाळणे शक्य आहे
जीवनशैलीत थोडा बदल केल्यास हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो. महिलांनी रोजच्या आहारात फळे, भाज्या, धान्य आणि फॅट-फ्री प्रोटीनचा समावेश करावा. आठवड्यातून किमान ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. योगा आणि ध्यानाने ताणतणाव कमी करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा, तसेच बीपी, कोलेस्ट्रॉल आणि शुगरची नियमित तपासणी करा.

