सार
Dussehra Wishes in Marathi 2024 : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असा दसऱ्याचा सण येत्या 12 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या दसऱ्यानिमित्त मित्रपरिवाराला पुढील कही मराठमोळी खास शुभेच्छापत्र पाठवू शकता.
Dussehra Wishes in Marathi 2024 : हिंदू धर्मात दसऱ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते. वाईटावर चांगल्याचा विजयाच्या रुपात दसरा साजरा केला जातो. दसऱ्याला रावणाचे दहनही केले जाते. याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करत लंकेवर विजय प्राप्त केला होता. अशातच यंदाच्या दसऱ्यानिमित्त मित्रपरिवाराला पुढील खास Message, WhatsApp Status, Facebook Post, HD Images,मराठमोळी शुभेच्छापत्रे शेअर करुन सण साजरा करा.
जल्लोष सणाचा
जल्लोष विजयाचा,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान."
भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
"उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा."
"आला आला दसरा, दुःख आता विसरा चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"
"आपट्याची पानं, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी"
"झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा"
अधर्मावर धर्माची विजय
असत्यावर सत्याची विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अज्ञानावर ज्ञानाची विजय
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
दसऱ्याला रावण दहन का केलं जात, काय आहे कारण?
Dussehra वेळी दारापुढे काढा या 5 मनमोहक रांगोळी, देवी होईल प्रसन्न (Watch Video)