सार
Diwali Padwa 2024 Wishes in Marathi : आज (02 नोव्हेंबर) सर्वत्र दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून आजचा सण साजरा करा.
Diwali Padwa Wishes 2024 in Marathi : बलिप्रतिपदा पाडवा हा एक हिंदू सण आहे. जो वाईटावर चांगल्याचा विजय आणि अन्यायावर सत्याचा विजय साजरा करतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असतो. या दिवशी गोवर्धन पूजा देखील करतात. या दिवशी अभंग स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. या दिवशी सोने खरेदी, सुवासणीकडुन पतीस औक्षण, व्यापारांच्या वर्षाचा प्रारंभ केला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेट वस्तू देतो. नवविवाहित दापंत्यासाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी सासरी करतात. याला दिवाळसन म्हणतात. यंदाच्या दिवाळी पाडव्यानिमित्त मित्रपरिवाराला खास मराठमोळे शुभेच्छापत्र, मेसेज, WhatsApp Status, Facebook Post, Images पाठवून आजचा सण साजरा करा.
गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पुर्तता, सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास...
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
दिवाळीत खूप गोड पदार्थ खाल्लेत? अशी करा बॉडी डिटॉक्स
ना अयोध्या ना काशी... या ठिकाणी दिवाळीसाठी येतात जगभरातील नागरिक