पिंकसिटी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या जयपुरमध्ये दिवाळीसाठी जगभरातील सात देशांमधून नागरिक दाखल झाले आहेत. यामध्ये रशिया, जापान, श्रीलंका, इटली आणि अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे.
जयपुर असे एकमेव शहर आहे जेथे जे वास्तुनुसार वसलेले आहे. येथील ऐतिहासिक सौंदर्य तुम्हाला जयपुरच्या प्रेमात पाडते.
यंदा जयपुरमध्ये प्रभू श्रीरामांची मोठी रोषणाई केलेली प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
जयपुरमध्ये पाच किलोमीटरच्या सात मार्केटमध्ये दीड लाख बल्बचा, 20 हजार ट्यूब लाइट आणि कोट्यावधींच्या संख्येने लहान लाइट्स लावण्यात आल्या आहेत.
जयपुरमधील हॉटेल बुकिंग देखील पर्यटकांमुळे फुल्ल झाली आहेत.
जयपुरमधील सर्व मंदिरे अयोध्येतील राम मंदिर आणि काशी मंदिराच्या थीमवर सजले आहेत.