दिवाळीवेळी दररोज नवे पदार्थ तयार केले जातात. नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी मिठाई दिली जाते. जाणून घेऊया दिवाळीत खूप मिठाई खाल्ल्यानंतर बॉडी डिटॉक्स कशी करायची याबद्दल सविस्तर.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फायबर महत्वाची भूमिका बजावतो. यासाठी दिवाळीत खूप मिठाई खाल्ल्यानंतर डाएटमध्ये बीन्स, कडधान्ये अशा पदार्थांचा समावेश करा.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हर्बल टी फायदेशी आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरिरातील टॉक्सिंसही निघून जातात. तुम्ही ग्रीन टी किंवा तुळशीची चहा पिऊ शकता.
सणासुदीच्या काळात वजन वाढवण्याच्या समस्येचा बहुतांशजणांना अनुभव येतो. यासाठी वजन नियंत्रणात राहण्यासाठी दिवसातून थोडावेळ तरी व्यायाम करावा.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी सणानंतर कॅफेनचे सेवनही मर्यादेत करा. याशिवाय मद्यपानही करू नका.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.