सार

Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळीच्या वेळी देवी लक्ष्मी आणि गणपतीची नवी मुर्ती स्थापन करणे शुभ मानले जाते. पण लक्षात असू द्या, मातीची मुर्तीच वेळोवेळी बदलली जाऊ शकते. सोनं किंवा पंचधातूची मुर्ती कधीच बदलली जात नाही.

Diwali 2024 Lakshmi Pujan : हिंदू धर्मातील सर्वाधिक मोठा सण असणारा दिवाळीचा सण येत्या 1 नोव्हेंबरला साजरा केला जामार आहे. या दिवसी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाणार आहे. यानिमित्त बहुतांशजण प्रत्येक वर्षी देवी लक्ष्मी आणि गणपतीची नवी मुर्ती खरेदी करतात. पण तुम्हाला माहितेय का, प्रत्येक दिवाळीला देवी लक्ष्मीची नवी मुर्ती खरेदी करणे का गरजेचे आहे? जाणून घेऊया यामागील मान्यता काय आहे सविस्तर....

दिवाळीवेळी देवी लक्ष्मीची मुर्ती स्थापन करण्याबद्दल देशभरात वेगवेगळ्या मान्यता आहेत. काहीजण दिवाळीवेळी घरी मुर्तीची स्थापना करतात. पण अशी मान्यता आहे की, जुन्या काळात केवळ धातू आणि मातीपासून तयार केलेल्या मुर्तींच वापरल्या जायच्या. या मुर्ती प्रत्येक वर्षी खंडीत किंवा त्याचा रंग बदलला जायचा. यामुळे प्रत्येक वर्षी नवी मुर्ती स्थापन केली जायची. तेव्हापासून नवी मुर्ती पूजेवेळी खरेदी करण्याची परंपरा सुरु झाली.

यंदा दिवाळी कधी?
यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. याच दिवशी लक्ष्मीपूजनही केले जाणार आहे. यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत असणार आहे.

नवी मुर्ती स्थापन करण्यामागील धार्मिक मान्यता
धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीवेळी नवी मुर्ती स्थापन केल्याने आध्यात्मिक विचार मनात संचारतात. गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे की, दिवाळीवेळी नवी मुर्ती खरेदी करुन घरी आणल्याने घरात नव्या उर्जेचा वास राहतो. यामुळे दिवाळीवेळी नवी मुर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. पण मुर्ती खरेदी करताना लक्षात ठेवा की, घरात चांदी, सोनं किंवा पंचधातूची मुर्ती असल्यास ज्याची वर्षानुवर्षे पूजा करत असाल तर अशा मुर्ती कधीच बदलल्या जात नाहीत. या मुर्तीचीच दिवाळीवेळी पूजा करावी.

मुर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
काहीजण दिवाळीवेळी गणपती आणि देवी लक्ष्मीची मुर्ती खरेदी करताना काही चुका करतात. अशी मुर्ती कधीच खरेदी करुन नये ज्याची पूजा करणे शुभ मानले जात नाही. देवी लक्ष्मी आणि गणपतीची मुर्ती दिवाळीआधी असणाऱ्या धनत्रयोदशीवेळी खरेदी करणे शुभ मानले जाते. शास्रानुसार, दिवाळी मुर्ती पूजनासाठी देवी लक्ष्मी आणि गणपती एकत्रित असणारी मुर्ती कधीच खरेदी करू नये.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

दिवाळी २०२४ या दिवशी देवी देवता सोडून कशाची पूजा करावी?

Diwali Ubtan Recipe : अभ्यंगस्नानासाठी आयुर्वेदिक उटणं, पाहा सोपी पद्धत