सार
Diwali Ubtan Recipe : दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. यावेळी उठणे लावून शाही स्नान करण्याची पद्धत आहे. अशातच यंदाच्या दिवाळीला घरच्याघरी आयुर्वेदिक आणि कमी खर्चात उटणं तयार करण्याची सोपी पद्धत पाहूया.
Diwali Ubtan Recipe in Marathi : येत्या 1 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. यावेळी अंगाला उटणं लावून आंघोळ केली जाते. यंदाच्या दिवाळीत घरच्याघरी आयुर्वेदिक पद्धतीचे उटणं कसे तयार करायचे याची पद्धत पाहूया. याशिवाय उटणं तयार करण्यासाठी लागणारे साहित्याबद्दल जाणून घेऊया…
साहित्य :
- पाव वाटी मसूर डाळ
- पाव वाटी बेसन
- पाव वाटी चंदन
- चार चमचे मुल्तानी माती
- दोन चमचे आंबे हळद
- एक चमचा वेखंड पावडर
- दोन चमचे नागरमोथा पावडर
- दोन चमचे तुळस बी पावडर
- दोन चमचे आवळा पावडर
- दोन चमचे गुलाब पावडर
- पाव वाटी चंदन
कृती :
- सर्वप्रथम एका भांडे घेऊन त्यामध्ये पाव वाटी मसूर डाळ, बेसन, चंदन, मुल्तानी माती, आंबे हळद, वेखंड पावडर, नागरमोथा पावडर, तुळस बी पावडर, आवळा पावडर, गुलाब पावडर आणि चंदन पावडर व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या.
- सर्व पावडर मिक्स केल्यानंतर चाळणीने चाळून घ्या. जेणेकरुन पावडरमधील खडे दूर होतील आणि उटण्यासाठी मऊसर पावडर तयार होईल.
- अभ्यंगस्नानावेळी उटण्याच्या पावडरमध्ये नारळाचे दूध, गुलाब पाणी मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करुन अंगाला लावा.
VIDEO : दिवाळीसाठी उटणं तयार करण्याची ही देखील सोपी पद्धत पाहा
आणखी वाचा :
Diwali 2024 : दिवाळीवेळी काढा या 8 मनमोहक मेंदी, खुलेल हाताचे सौंदर्य
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशी साजरी करण्यामागील वाचा पौराणिक कथा