तेलाशिवाय तयार करा स्वादिष्ट दही वडा, वाचा रेसिपी स्टेप बाय स्टेप

| Published : Jan 13 2025, 12:08 PM IST

Dahi Wada
तेलाशिवाय तयार करा स्वादिष्ट दही वडा, वाचा रेसिपी स्टेप बाय स्टेप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Zero Oil Dahi Wada Recipe : दही वड्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. पण तेलाशिवाय दही वडा कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

Dahi Wada Recipe in Marathi : दही वडा संध्याकाळचा नाश्ता किंवा पाहुणे मंडळी घरी येणार असल्यास करतो. दही वड्याची रेसिपी अगदी सोपी असली तरीही त्यासाठी भरपूर तेल लागते. पण तेलाशिवाय दही वडा कसा तयार करायचा याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

सामग्री

  • 1/4 वाटी डाळींब
  • 1/4 वाटी काजू
  • मूग आणि उडादाची डाळ
  • हिरवी मिरची
  • धणे
  • आलं
  • चवीनुसार मीठ

कृती

  • सर्वप्रथम मूग आणि उडदाची डाळ 20 मिनिटे भिजवून ठेवा.
  • मिक्सरमध्ये मूग आणि उडदाची भिजवलेली डाळ, आलं घालून घट्ट वाटून घ्या.
  • मिक्सरमधील मिश्रण एका भांड्यात काढा आणि क्रिमसारखे फेटून घ्या.
  • एका वाटीत पाणी दही वड्याच्या पीठात घालून घ्या.
  • पीठ इडलीच्या भांड्यात घालून 10-15 मिनिटांसाठी शिजवून घ्या. यानंतर मीठाच्या पाण्यात भिजवा. यामुळे वडे फुगले जातील.
  • वडे प्लेटमध्ये काढून त्यावरुन दही, काळं मीठ, जीरे आणि लाल तिखट स्प्रे करा.
  • गार्निशिंगसाठी डाळींब, काजूचा वापर करा. अशाप्रकारे हेल्दी आणि झिरो ऑइल दही वडे रेसिपी नक्की ट्राय करा.
View post on Instagram
 

आणखी वाचा : 

बाजरीच्या इडलीचा घ्या आस्वाद ! जाणुन घ्या रेसिपी

Makar Sankranti: घरच्या घरी तिळाचे लाडू पटकन बनवा, प्रोसेस जाणून घ्या