मान्सूमध्ये मुंबईतील 5 धोकादायक डॅम, पावसाळ्यात होऊ शकते मोठी दुर्घटना

| Published : Jul 01 2024, 10:20 AM IST

Bhushi Dam

सार

महाराष्ट्रातील लोणावळा येथील भूशी डॅममध्ये एकाच परिवारातील पाचजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. यामधील तीन जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अशातच मान्सूनमध्ये मुंबईतील धोकादायक डॅम कोणते जाणून घेऊया…

5 Risky Dams During Monsoon in Mumbai :  मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर बहुतांशजण फिरायला जायचे प्लॅन करतात. एखादे हिल्स स्टेशन असो अथवा धबधबा तेथे पर्यटकांची फार मोठी गर्दी होताना दिसून येते. अशातच महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ असणाऱ्या भूशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. खरंतर, पोलीस प्रशासनाकडून डॅमजवळ न जाण्याचा इशारा देऊनही काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून तेथे जातात. जाणून घेऊया मुंबईजवळील असे कोणते 5 टॉप धोकादायक डॅम आहेत जेथे मान्सूनमध्ये अजिबात जाण्याचा विचार देखील करु नये याबद्दल अधिक...

मुंबईतील 5 टॉप धोकादायक डॅम

  • वसई येथील चिंचोटी डॅमला मान्सूनमध्ये भेट देण्यासाठी पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. येथे पावसाळ्यात जाणे धोकादायक ठरू शकते. कारण पाण्याची पातळी वाढण्यासह पाण्याचा प्रवाह वाढला जातो.
  • बदलापुरजवळील कोंडेश्वर देखील धोकादायक डॅमपैकी एक आहे. येथे गेल्याच आठवड्यात एका तरुणाचा वाहत्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. खरंतर, मान्सूनमध्ये पर्यटकांना काही धोकादायक ठिकाणी न जाण्याचा इशारा अथवा सूचना दिल्या तरीही जीव धोक्यात घातल्याने मोठी दुर्घटना घडली जाते.
  • पनवेल येथील गाडेश्वर डॅमही सर्वाधिक धोकादायक डॅम आहे. येथे आधीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मान्सूनमध्ये गाडेश्वर डॅममध्ये वाहून गेल्याने अथवा बुडून झाल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत.
  • टिटवाळा येथील काळू डॅम देखील धोकादायक असल्याचे सांगितले जाते. मान्सूनमध्ये काळू डॅमच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. नागरिकांना काळू डॅमजवळ जाण्यास सक्त मनाई केली जाते.
  • इगतपुरीमधील वैतरणा डॅमही मान्सूनमध्ये धोकादायक होते. येथेही मान्सूनमध्ये पर्यटकांची गर्दी होते. इगतपुरीच्या आसपास फिरण्यासाठी अनेक स्थळे आहेत. पण वैतरणा डॅमला मान्सूनमध्ये जाणार असल्यास काळजी घ्या.

काय काळजी घ्याल?
मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी जाण्यास सक्त मनाई केली जाते. स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना या संदर्भात सूचना देखील दिल्या जातात. पण डॅम, नदी, धबदबा अथवा निसरड्या मार्गांचे किल्ले, डोंगर येथे जाणे टाळावे. याशिवाय पाण्याची पातळी पाहूनच नागरिकांनी धबधबा, डॅम अशा ठिकाणी जाणे टाळावे. याशिवाय सर्वाधिक महत्वाचे म्हणजे मान्सूनमध्ये धोकादायक ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे.

आणखी वाचा : 

National Doctor’s Day 2024 : डॉक्टर्स डे साजरा करण्यामागील कारण माहितेय का? जाणून घ्या थीम, इतिहास आणि महत्व

मान्सूनमध्ये भारतातील या 8 ठिकाणी चुकूनही जाऊ नका, धोक्यात पडाल