मे महिन्यानंतर झालेल्या बर्फवृष्टीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातात. पण केदारनाथला पावसाळ्यात चुकूनही जाऊ नका. येथे मोठ्या प्रमाणात भूत्सखलन होते.
मेघालय फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन असले तरीही येथे मॉन्सूनमध्ये जाणे टाळा. मेघालयातील चेरापूंजी आणि मौसिनराम येथे दरवर्षी खूप पाऊस पडतो
मॉन्सूनमध्ये चुकूनही स्पिती व्हॅलीला भेट देऊ नका. येथे भूत्सखलन होण्याचा मोठा धोका निर्माण होत असल्याने अशा ठिकाणी जाणे टाळा.
दिल्ली ते उत्तराखंडचा प्रवास अगदी कमी वेळाचा आहे. पण पावसाळ्यात उत्तराखंडला जाणे टाळा. येथे मॉन्सूनमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने रस्ते निसरडे होण्यासह भूत्सखलन होते.
पावसाळ्यात केरळ हिरवेगार झाल्याचे दिसते. पण केरळातील मुसळधार पावसामुळे कधीकधी पुराची स्थितीही निर्माण होते. अशातच केरळात जायचे असल्यास सप्टेंबर ते मार्च महिन्यात जाणे बेस्ट आहे.
तमिळनाडूतील चेन्नईत मुसळधार पाऊस कोसळतो. येथे पुर येण्याची स्थितीही निर्माण होते.
‘क्विन ऑफ हिल्स’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची फार गर्दी होत असते. पण मॉन्सूनमध्ये दार्जिलिंगला जाण्याचे टाळा. येथे पावसाळ्यात घराबाहेर पडणेही मुश्किल होते.
आसाममध्ये मान्सूनच्या काळात मुसळधार पाऊस पडतो. यामुळे आसाममध्ये पुर येणे, भूत्सखलन होणे अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली जाते.