National Doctor’s Day 2024 : डॉक्टर्स डे साजरा करण्यामागील कारण माहितेय का? जाणून घ्या थीम, इतिहास आणि महत्व

| Published : Jul 01 2024, 09:29 AM IST

doctors day
National Doctor’s Day 2024 : डॉक्टर्स डे साजरा करण्यामागील कारण माहितेय का? जाणून घ्या थीम, इतिहास आणि महत्व
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

National Doctor’s Day 2024 : राष्ट्रीय डॉक्टर्स डे एक महत्वपूर्ण दिवस असून भारतातील डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवाभाव आणि योगदानाला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो. यंदाच्या डॉक्टर्स डे ची थीसह महत्व, इतिहास जाणून घेऊया…

National Doctor’s Day 2024 :  डॉक्टरांना देवाचे दुसरे रुप मानले जाते. कारण आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांकडे सर्वप्रथम आपण धाव घेतो. दररोज अनेकांना डॉक्टरांच्या उपचारामुळे जीवनदान मिळत असते. डॉक्टरच रुग्णाला नवे जीवन देतात आणि आरोग्यासंबंधित समस्यांपासून बचाव करतात. यामुळेच डॉक्टरांना समाजात महानायक असेही म्हटले जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात डॉक्टर फार मोठी महत्वाची भूमिका बजावतता. मानवी आयुष्यासाठी डॉक्टरांच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक वर्षी 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो.

इतिहास
राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यामागील कार म्हणजे प्रसिद्ध डॉक्टर आणि बंगालधील दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्यासह डॉक्टरांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला होता. वयाच्या 80 व्या वर्षीत डॉ. रॉय यांचे निधन झाले. ते प्रसिद्ध राजकीय नेते होते. रॉय यांच्या सन्मार्थ आणि सर्व डॉक्टरांच्या कार्याला सलमान करण्यासाठीच राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो.

यंदाची थीम काय?
यंदाच्या वर्षी साजरा केल्या जाणाऱ्या डॉक्टर्स डे निमित्तची थीम ‘Healing Hands, Caring Hearts’ अशी ठेवण्यात आली आहे. खरंतर, डॉक्टर्स देवासमान आपल्या आरोग्यासाठी धावून येत उपचार करतात. जगभरातील अनेकजण असतील त्यांना आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. अथवा काहीजण आपल्या नातेवाईकांना आरोग्याच्या समस्यांमुळे जीव गमवावा लागतो. पण अशावेळी डॉक्टर्स देवदूताप्रमाणे आपले कार्य करत व्यक्तीच्या आरोग्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यास नेहमीच प्रयत्नशील असतात.

पहिल्यांदा कधी साजरा केला होता डॉक्टर्स डे?
भारतात पहिल्यांदा डॉक्टर्स डे वर्ष 1991 रोजी साजरा करण्यात आला होता. प्रसिद्ध वैद्यकीय डॉ. बिधान रॉय यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 1 जुलैला 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' साजरा केला जातो.

डॉक्टर्स डे महत्व
डॉक्टर्स डे अशा सर्व डॉक्टरांसाठी समर्पित आहे, जे अहोरात्र रुग्णालयात रुग्णांनी निस्वार्थपणे सेवा करतात. हा दिवस आरोग्यासंबंधित सेवा उत्तम पद्धतीने नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासाच्या दृष्टीनेही खास आहे. डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठीच प्रत्येक वर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय ठिकठिकाणी मोफत शिबीरेही ठेवली जातात.

आणखी वाचा : 

पावसाळ्यात Frizzy Hair ची काळजी घेण्यासाठी टिप्स, वाढेल केसांची चमक

Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दाखवा हा नैवेद्य, पैशांसंबंधित समस्या होतील दूर