सोशल मीडियात व्हायरल होतोय Puni Puri Juiceचा व्हिडीओ, नेटकऱ्यांनी म्हटले.....

| Published : Jan 03 2024, 06:00 PM IST / Updated: Jan 05 2024, 04:23 PM IST

Viral-video-of-pani-puri-juice

सार

सर्वांनाच पाणी पुरी खायला आवडते. पण सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाणी पुरी ज्युस तयार करताना दिसून येत आहे.

Pani Puri Juice Viral Video : सोशल मीडियात काही विचित्र फूड्सचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. अशातच आता पाणी पुरीची एक अतरंगी रेसिपी व्हायरल होत आहे. ही रेसिपी पाहून नक्कीच तुम्ही संताप व्यक्त कराल. खरंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील व्यक्ती पाणी पुरीचा ज्युस तयार करताना दिसून येत आहे.

पाणी पुरी नव्हे तर चक्क ज्युस
इंस्टाग्रामवर pallavi_sinha12 नावाच्या पेजवर पाणी पुरी ज्युसचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच पाणी पुरीच्या पुऱ्या टाकत त्यामध्ये कांदा, बटाटा आणि पाणी पुरीचे पाणी मिक्स केल्याचे दिसून येत आहे. यानंतर या सर्व गोष्टी वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा ज्युस आणि चॉकलेट सिरपही मिक्स केल्याचे दिसून येत आहे.

Viral Video: पाणी पुरी ज्युसचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल का? 

View post on Instagram
 

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या पाणी पुरीच्या ज्युसला 40 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

एका युजरने म्हटले की, आता हार्पिक टाकणे शिल्लक राहिले आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, तुम्हाला पाप लागेल. तिसऱ्याने लिहिले की, गरुड पुराणात यासाठी वेगळी शिक्षा लिहिण्यात आली आहेत.

आणखी वाचा 

सांबार आणि रसम मधील हा आहे फरक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे: 

Moong Dal Dosa : मुलांना नाश्तासाठी बनवा चविष्ट असा मूग डाळीचा डोसा

Cauliflower Manchurian Recipe : घरच्याघरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट फ्लॉवर मंच्युरिअन