Marathi

Food

संध्याकाळच्या नाश्तासाठी घरच्याघरी बनवा या 7 प्रकारचे Veg Kabab

Marathi

मिक्स व्हेज कबाब

बारीक चिरलेला गाजर, मटार, बटाटा आणि फरसबीमध्ये मसाला व हर्ब्स मिक्स करा. यानंतर कबाबला ब्रेडक्रंबमध्ये घोळवून गोल आकार द्या. मिक्स व्हेज कबाब तुम्ही तळून किंवा बेक करून खाऊ शकता.

Image credits: social media
Marathi

बीट-चणा कबाब

उकडलेल्या बीटाला किसून त्यामध्ये मसाले, बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. कबाबचा आकार देऊन पॅनमध्ये बीट-चणा कबाब तळून घ्या.

Image credits: social media
Marathi

ब्रोकोली-चीज कबाब

बारीक चिरलेल्या ब्रोकोलीमध्ये किसलेले चीज मिक्स करा. यामध्ये बटाटा आणि ब्रेडक्रंब मिक्स करून कबाबला गोल आकार द्या. कबाब गोल्डन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.

Image credits: social media
Marathi

बेल पेपर कबाब

ढोबळी मिरची घेऊन त्यामधील बिया काढून टाका. यामध्ये बटाटा, मटार आणि पनीरचे मसालेदार मिश्रण मिक्स करा. मिरची नरम होईपर्यंत भाजून घ्या.

Image credits: freepik
Marathi

मका-बटाटा कबाब

स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मका, हिरवी मिरची आणि मसाले मिक्स करा. मिश्रणाला पॅटीसचा आकार देत तळून घ्या. अशाप्रकारे तयार होईल मका-बटाट्याच्या कबाबची रेसिपी.

Image credits: social media
Marathi

पालक-चणा कबाब

उकडलेले चणे व पालक एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यामध्ये मसाले, लसूण, हिरवी मिरची टाका. ब्रेडक्रंबचा वापर करत कबाबला गोल आकार द्या. कबाब गोल्डन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.

Image credits: social media
Marathi

पनीर टिक्का

पनीरला चौकोनी आकारात कापून घेत त्यावर जीरे, धणे पावडर आणि गरम मसाल्याच्या मिश्रणात मॅरिनेट करा. मॅरिनेट केलेले पनीर गॅसवर किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या.

Image Credits: Image: Freepik