शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. प्रत्येकाने रोज किती प्रमाणात पाणी प्यायला हवे, वाचा.
दिवसभरात श्वासोच्छवास,लघवी, घाम व इतर क्रियांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
निर्जलीकरण (Dehydration) व त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वांनीच दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. जाणून घ्या आपण दररोज किती पाणी प्यायला हवे.
तुम्हाला पाण्याची किती गरज आहे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. पाण्याची गरज ही आपापल्या शरीराप्रमाणे वेगवेगळी असते.
महिलांनी दररोज 11.5 कप म्हणजेच 2.7 लीटर पाणी प्यायला हवे असे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते पुरुषांना दररोज 15.5 कप म्हणजेच 3.7 लिटर पाण्याची गरज असते.
यामध्ये पाण्याखेरीज आहारातील इतर द्रवपदार्थ जसे की ताक, चहा आणि रस यांसारखी पेये आणि अन्नपदार्थ यांचाही समावेश होतो.
तुम्हाला किती पाण्याची गरज आहे हे तुमच्या राहण्याचे ठिकाण, वातावरण, तापमान व ऋतू, आहार, तुम्ही किती सक्रिय आहात, तुमचे आरोग्य, पथ्य, व्याधी या घटकांवर देखील अवलंबून आहे.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.