सार
Chakali Recipe in Marathi : दिवाळीवेळी घरी फराळ तयार केला जातो. यावेळी चिवडा, चकली, लाडू असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच यंदाच्या दिवाळीवेळी भाजणीच्या चकल्या कशा तयार करायच्या याची रेसिपी पाहूया सविस्तर…
Chakali Recipe for Diwali 2024 : दिवाळी फराळाशिवाय अपूर्ण आहे. फराळासाठी पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी, लाडू, चकली, नानखटाई असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच चकली तयार करताना कधीकधी व्यवस्थितीत तळल्या जात नाहीत. अथवा तळताना तुटल्या जातात. अशातच खुसखुशीत भाजणी चकलीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया सविस्तर…
साहित्य :
- 1/2 किलो भाजणीचे पीठ
- 5 टेबलस्पून तेल मोहनसाठी
- 10 ते 12 हिरव्या मिरच्या
- आले लसुण
- 1 टेबलस्पून तिखट
- 2 टीस्पून हळद
- 1 टेबलस्पून ओवा
- 1 टेबलस्पून तीळ
- चवी नुसार मीठ
- 1 टेबलस्पून आमचूर पावडर
- तळण्यासाठी तेल
- पाणी आवश्यकतेनुसार
कृती :
- भाजणीच्या पिठात 3 चमचे गरम तेलाचे मोहन घाला.
- आले लसुण, हिरवी मिरची, कढी पत्ता यांची एकत्र पेस्ट करून घ्या.
- एका कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात एकत्र केलेली पेस्ट शिजवून घ्या.
- त्यात ओवा, तीळ, तिखट, हळद, आमचूर पावडर आणि चवी नुसार मीठ घालून 2 मिनिटे शिजवून घ्या. यानंतर पीठामध्ये पाणी टाकून गरम होऊ द्यावे दोन उकळी आल्यावर गॅस बंद करा.
- गॅस बंद केल्यावर उकडीचे पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
- भाजणीच्या पीठात उकडीचे पाणी घालून मळून घेतल्यानंतर 10 मिनिटे झाकून ठेवून द्या.
- 10 मिनिटांनी पुन्हा एकदा पीठ मळून घ्या आणि त्याचे गोळे करून घेत चकलीच्या साच्याने चकली पाडून घ्या.
- चकल्या गरम तेलामध्ये तळून घ्या आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी व्यवस्थितीत तळून घ्या.
- चकल्या थंड झाल्यावर एका झाकणबंद डब्यात भरुन ठेवा.
- भाजणीच्या चकल्या दिवाळी फराळावेळी घरातील मंडळी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना खाण्यासाठी सर्व्ह करा.
VIDEO : घरच्याघरी यंदाच्या दिवाळीला तयार करा भाजणीच्या चकल्या, पाहा शेटवपर्यंत संपूर्ण व्हिडीओ
आणखी वाचा :
रिंकू राजगुरूसारखा यंदाच्या दिवाळीला करा लूक, सर्वांच्या वळतील नजरा
दिवाळीसाठी पेपर ते कापडापर्यंत तयार करा या 5 प्रकारचे DIY कंदील, पाहा VIDEO