MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Home Tips: उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर ठेवा थंडा थंडा कुल कुल! या ट्रिक्स वापरा

Home Tips: उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर ठेवा थंडा थंडा कुल कुल! या ट्रिक्स वापरा

Home Tips: उन्हाळा आला की तापमानाचा पारा चढतो. बाहेरची गरमी सहन करणं तर अवघडच, काही घरांमध्ये तर दुपारी बसणंही मुश्किल होतं. अशावेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही घर नैसर्गिकरित्या थंड ठेवू शकता. जाणून घेऊयात याबद्दल अधिक….

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 10 2026, 08:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे उपाय
Image Credit : Getty

उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे उपाय

उन्हाळ्यात फक्त बाहेरच नाही, तर घरात राहणंही कठीण होऊन बसतं. दुपारच्या वेळी तर काही घरांमध्ये प्रचंड गरम होतं. ज्यांच्याकडे एसी किंवा कूलर आहे त्यांना थोडा दिलासा मिळतो, पण ज्यांच्याकडे नाही, त्यांची मोठी अडचण होते. पण एकही पैसा खर्च न करता नैसर्गिक उपायांनी घर थंड ठेवण्याच्या काही सोप्या टिप्स आहेत. चला पाहूया.
26
खिडक्या आणि दारं...
Image Credit : chat gpt

खिडक्या आणि दारं...

उन्हाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ घराच्या खिडक्या आणि दारं उघडी ठेवा. सकाळची हवा थंड असते, तेव्हा खिडक्या उघडल्यास घरातली गरम हवा बाहेर जाते. तसंच, सूर्यास्तानंतरही थोडा वेळ दारं उघडी ठेवल्यास घरातलं वातावरण थंड होतं. पण दुपारच्या वेळी बाहेरची गरम हवा आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद ठेवणं महत्त्वाचं आहे.

Related Articles

Related image1
Summer Curtains : लिनन, कॉटन ते शीअर... उन्हाळ्यात घर दिसेल कूल-कूल!
Related image2
Summer Plants: 45°C तापमानातही कोमेजणार नाहीत, उन्हाळ्यात लावा ही 5 झाडं
36
झाडं लावा
Image Credit : meta ai

झाडं लावा

झाडं नैसर्गिकरित्या वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. बाल्कनी, खिडकीजवळ किंवा घरासमोर छोटी-छोटी रोपं लावल्यास हवेत थोडा ओलावा टिकून राहतो आणि थंडावा जाणवतो. विशेषतः तुळस, मनी प्लांट, कोरफड यांसारखी रोपं घरातील वातावरण सुधारतात. झाडं कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात, त्यामुळे घरातील हवेची गुणवत्ताही सुधारते.
46
जाड पडद्यांचा वापर
Image Credit : our own

जाड पडद्यांचा वापर

घरात थेट सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या. खिडक्यांना जाड किंवा हलक्या रंगाचे पडदे लावल्यास घरात येणारी उष्णता बऱ्याच प्रमाणात कमी होते. काही घरांमध्ये खिडक्यांच्या बाहेरच्या बाजूला गवताच्या किंवा बांबूच्या चटया लावतात. यामुळेही बाहेरची उष्णता कमी होते. त्याचप्रमाणे, घराच्या छतावर जिथे जास्त ऊन लागतं, तिथे पांढरा रंग दिल्यासही घरातला उकाडा कमी होतो.
56
पाणी शिंपडणे...
Image Credit : Getty

पाणी शिंपडणे...

पूर्वीच्या काळी अनेकजण घरासमोर किंवा अंगणात पाणी शिंपडून थंडावा मिळवायचे. ही पद्धत आजही खूप उपयोगी आहे. घरासमोर किंवा टेरेसवर पाणी शिंपडल्यामुळे आजूबाजूचं वातावरण थंड होतं. तसेच, काही घरांमध्ये खिडक्यांना ओले कपडे किंवा ओल्या चटया लटकवल्या जातात, त्यामुळे येणारी हवा थंडगार होते.
66
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर
Image Credit : our own

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर

टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, लाइट्स आणि किचनमधील काही उपकरणं उष्णता निर्माण करतात. यांचा जास्त वेळ वापर केल्यास घरातील तापमान वाढू शकतं. त्यामुळे गरज नसताना लाइट्स किंवा इतर उपकरणं बंद करणं चांगलं. विशेषतः दुपारी स्वयंपाक करताना किचनच्या खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून गरम हवा बाहेर जाईल.

About the Author

MD
Marathi Desk 1
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Barley Sattu: गुणकारी सातूचं पीठ सगळ्यांसाठी फायदेशीर नाही; 'या' लोकांनी लांबच राहावं
Recommended image2
Jewellery: ग्लॉसी जेली बांगड्यांनी बदला तुमचा लुक, प्रत्येकजण विचारेल!
Recommended image3
Beauty Tips: केस पातळ झालेत? हा 'वुल्फ कट' ट्राय करा, मिळेल व्हॉल्यूम
Recommended image4
Jewellery: खडे, मोती आणि कुंदन वर्क, चांदबालीच्या 6 सुंदर डिझाइन्स
Recommended image5
Onion Peel Fertilizer: ही ट्रिक कळल्यावर कांद्याची सालं कधीच फेकणार नाही! असं बनवा जबरदस्त खत
Related Stories
Recommended image1
Summer Curtains : लिनन, कॉटन ते शीअर... उन्हाळ्यात घर दिसेल कूल-कूल!
Recommended image2
Summer Plants: 45°C तापमानातही कोमेजणार नाहीत, उन्हाळ्यात लावा ही 5 झाडं
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved