MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Vastu Tips : पलंगाखाली चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात येईल गरिबी आणि आजारपण!

Vastu Tips : पलंगाखाली चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात येईल गरिबी आणि आजारपण!

वास्तुशास्त्रानुसार घरात शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य जागी असणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, आपण ज्या पलंगावर झोपतो, त्याच्या खाली ठेवलेल्या काही वस्तू आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतात.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 20 2026, 06:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
पलंगाखाली ठेवू नयेत अशा वस्तू
Image Credit : AI Image

पलंगाखाली ठेवू नयेत अशा वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, आपण ज्या पलंगावर झोपतो, ते फक्त फर्निचर नाही, तर आपल्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे. पलंगाच्या आसपासचं वातावरण आपल्या आरोग्यावर आणि झोपेवर परिणाम करतं. अनेकजण जागेअभावी पलंगाखाली सामान ठेवतात. पण काही वस्तू पलंगाखाली ठेवल्यास घरात नकारात्मकता येते. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
इलेक्ट्रॉनिक वस्तू
Image Credit : Gemini

इलेक्ट्रॉनिक वस्तू

वास्तु तज्ज्ञ सांगतात की, पलंगाखाली मोबाईल चार्जर, इलेक्ट्रॉनिक वायरी, जुन्या बॅटरी किंवा पॉवर बँक यांसारख्या वस्तू अजिबात ठेवू नका. अशा वस्तू पलंगाखाली ठेवणं अशुभ मानलं जातं. विशेषतः बंद पडलेल्या किंवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पलंगाखाली ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीनेही हे धोकादायक आहे.

Related Articles

Related image1
Kitchen Vastu : घरात 3 बर्नरची गॅस शेगडी अशुभ? यामुळे खर्च वाढतो? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
Related image2
Vastu Tips: ताटात कधीही एकत्र ३ चपात्या का वाढू नयेत? जाणून घ्या यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण!
37
जुनी वर्तमानपत्रं
Image Credit : our own

जुनी वर्तमानपत्रं

अनेक लोक जागेअभावी जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, जुनी बिलं आणि इतर कागदपत्रं पलंगाखाली ढीग करून ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, पलंगाखाली अशी रद्दी साठवणं चांगलं नाही. पलंग ही विश्रांतीची जागा आहे, त्यामुळे तिच्या आजूबाजूला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असणं महत्त्वाचं आहे.
47
जुने कपडे
Image Credit : Getty

जुने कपडे

जर तुम्हाला पलंगाखाली जुने, फाटलेले किंवा वापरात नसलेले कपडे ठेवायची सवय असेल, तर ती लगेच सोडा. वास्तुशास्त्रानुसार, असे कपडे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि वातावरण जड करतात. यामुळे मानसिक शांतता कमी होते आणि प्रगतीत अडथळे येतात, असं वास्तु तज्ज्ञ सांगतात.
57
धारदार वस्तू
Image Credit : Getty

धारदार वस्तू

कात्री, चाकू, सुई किंवा पिना यांसारख्या धारदार वस्तू चुकूनही पलंगाखाली ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे घरात तणाव निर्माण होतो. या कारणामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद आणि भांडणं होऊ शकतात.
67
औषधं
Image Credit : pexels

औषधं

अनेकजण रात्री गरज लागेल म्हणून औषधं पलंगाखाली ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं योग्य नाही. पलंगाखाली औषधं ठेवल्याने घरात नकारात्मक वातावरण वाढतं आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आजारपण आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांची शक्यता वाढते, असं तज्ज्ञ सांगतात.
77
सकारात्मक ऊर्जेसाठी...
Image Credit : Gemini AI

सकारात्मक ऊर्जेसाठी...

वास्तु तज्ज्ञांच्या मते, पलंगाखाली कोणतीही अनावश्यक वस्तू ठेवू नये. पलंगाखालची जागा जितकी मोकळी आणि स्वच्छ असेल, तितकी सकारात्मक ऊर्जा घरात पसरेल. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि आयुष्यात यश मिळण्यास मदत होईल.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Goddess Durga Mantras : दुर्गा देवीचे 9 पॉवरफुल मंत्र... जपल्यास धन आणि ऐश्वर्य वाढेल, अत्यंत लाभदायक
Recommended image2
Cloves Benefits : उशीखाली लवंग ठेवून झोपलात तर काय होतं?
Recommended image3
Dark Circles Home Remedies : डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय
Recommended image4
Mosquito Net Cleaning : खिडकीची जाळी न काढता अशी करा स्वच्छ, मिनिटांत होईल नव्यासारखी
Recommended image5
Uric Acid Diet : युरिक ॲसिडचा त्रास आहे? मग या 7 पदार्थांपासून लांबच राहा
Related Stories
Recommended image1
Kitchen Vastu : घरात 3 बर्नरची गॅस शेगडी अशुभ? यामुळे खर्च वाढतो? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
Recommended image2
Vastu Tips: ताटात कधीही एकत्र ३ चपात्या का वाढू नयेत? जाणून घ्या यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved