MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Vastu : घरात 3 बर्नरची गॅस शेगडी अशुभ? यामुळे खर्च वाढतो? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

Kitchen Vastu : घरात 3 बर्नरची गॅस शेगडी अशुभ? यामुळे खर्च वाढतो? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतं. नकळत झालेल्या चुकांमुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मग, वास्तुनुसार घरात 3 बर्नरची शेगडी असणं चांगलं की वाईट? यामुळे खरंच आर्थिक संकट येतं का? जाणून घेऊया.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 18 2026, 04:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
वास्तुशास्त्र काय सांगतं?
Image Credit : Flipkart Website

वास्तुशास्त्र काय सांगतं?

आपलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही, तर ते घराच्या सौभाग्याचं प्रवेशद्वार आहे. इथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो. या पवित्र जागेत सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. पण, हल्ली अनेकांना एक प्रश्न पडतो - 'घरात 3 बर्नरची गॅस शेगडी वापरल्याने गरिबी येते का?' यातलं सत्य आणि महत्त्वाचे वास्तू नियम जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
3 बर्नरची गॅस शेगडी खरंच अशुभ आहे का?
Image Credit : chat gpt

3 बर्नरची गॅस शेगडी खरंच अशुभ आहे का?

आपल्या समाजात 'तीन' या आकड्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज आहे. त्यामुळेच 3 बर्नरची शेगडी वापरल्यास आर्थिक अडचणी किंवा वास्तुदोष निर्माण होतो, अशी भीती काहींना वाटते. पण, वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते हा निव्वळ एक गैरसमज आहे. गॅस शेगडीला किती बर्नर आहेत, यावरून वास्तुदोष ठरत नाही. कुटुंबाची गरज म्हणून तुम्ही 3 किंवा 4 बर्नरची शेगडी वापरू शकता, त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. बर्नरच्या संख्येपेक्षा ती शेगडी स्वयंपाकघरात कोणत्या दिशेला ठेवली आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे.

Related Articles

Related image1
Sharp Memory : या 3 राशींची स्मरणशक्ती कॉम्प्युटरपेक्षाही तेज, लहान गोष्टही विसरत नाही
33
हे वास्तू नियम नक्की पाळा
Image Credit : Pixabay

हे वास्तू नियम नक्की पाळा

तुमच्या घरात कितीही बर्नरची शेगडी असली तरी, अग्नी देवतेची कृपा आणि घरात लक्ष्मीचा वास टिकून राहावा यासाठी खालील नियम नक्की पाळा -

योग्य दिशा (आग्नेय) - गॅस शेगडी नेहमी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात (पूर्व-दक्षिण) ठेवावी. ही अग्नी तत्त्वाची दिशा असल्याने इथे शेगडी ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते.

पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक - जेवण बनवताना गृहिणीचं किंवा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं तोंड नेहमी पूर्व दिशेला असावं. यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरात शांतता नांदते.

ईशान्य दिशेला शेगडी नकोच - स्वयंपाकघराची ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व) ही जल तत्त्वाची जागा आहे. त्यामुळे या पवित्र ठिकाणी गॅस शेगडी ठेवल्यास गंभीर वास्तुदोष, आर्थिक नुकसान आणि घरात कलह निर्माण होतात.

सिंक आणि शेगडी शेजारी नको - पाणी आणि अग्नी हे परस्परविरोधी घटक आहेत. त्यामुळे वॉश सिंक आणि गॅस शेगडी एकमेकांच्या शेजारी न ठेवता त्यांच्यात थोडं अंतर ठेवा. नाहीतर कुटुंबात मतभेद वाढतात. थोडक्यात, तुमच्या घरात 3 बर्नरची शेगडी असेल तर उगाच काळजी करू नका. बर्नरची संख्या नाही, तर ती योग्य दिशेला ठेवणं आणि योग्य पद्धतीने स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image2
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image3
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image4
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Recommended image5
Egg vs Chicken vs Mutton : अंडी, चिकन की मटण... सर्वात जास्त प्रोटीन कशात असतं?
Related Stories
Recommended image1
Sharp Memory : या 3 राशींची स्मरणशक्ती कॉम्प्युटरपेक्षाही तेज, लहान गोष्टही विसरत नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved