10 जास्वंदाची फुले, 10 जास्वंदाच्या रोपाची पाने, एक कप नारळाचे तेल
Image credits: Getty
Marathi
तेल कसे तयार करावे?
जास्वंदाची फुले व पाने स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट तयार करून घ्या.
Image credits: Getty
Marathi
नारळाच्या तेलात पेस्ट गरम करा
आता एका कढईमध्ये एक कप नारळाचे तेल गरम होण्यास ठेवून द्या आणि तेल कोमट झाल्यास त्यामध्ये जास्वंदाच्या फुले व पानांची पेस्ट टाकावी.
Image credits: Getty
Marathi
तेल कसे करावे स्टोअर?
तेल गरम झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवा व गॅस बंद करावा. तेल थंड झाल्यानंतर ते गाळा व एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
Image credits: Getty
Marathi
आठवड्यातून कितीदा तेल लावावे?
आपल्या आवश्यकतेनुसार केसांना तेल लावा व हलक्या हाताने मसाज करावा. 30 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करावा.
Image credits: Getty
Marathi
केसांना मिळणारे लाभ
केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाच्या फुलाचे तेल अतिशय लाभदायक आहे. याद्वारे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credits: Getty
Marathi
तेलातील पोषकघटक
जास्वंदाच्या तेलामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस व लोह यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा आहे. हे घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत. शिवाय नारळाच्या तेलामुळे केसांचे तुटणे देखील कमी होते.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा