दूध विक्री करणाऱ्याची मुलगी बनली IAS, शिक्षणाची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे
- FB
- TW
- Linkdin
IAS अनुराधा पाल कोण आहेत?
अनुराधा पाल या उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका लहान गावातील आहेत. सर्वसामान्य परिवारातील असलेल्या अनुराधा यांना बालपणात खूप आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यांचे वडील दूध विक्री करून परिवाराचे पालन-पोषण करायचे.
जवाहर नवोदय विद्यालयातून घेतले शिक्षण
अनुराधा पाल यांनी जवाहर नवोदय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर महाविद्यातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनुराधा दिल्लीत आल्या. दिल्लीतील जीबी पंत विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले.
टेक महिंद्रामध्ये नोकरी
घरातील आर्थिक स्थिती ढासळलेली असल्याने अनुराधा यांनी टेक महिंद्रा कंपनीत नोकरी केली. काही काळ टेक महिंद्रामध्ये नोकरी केल्यानंतर अनुराधा यांनी युपीएससीची तयार करण्यासाठी नोकरी सोडली.
कोचिंग फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवले
उत्तराखंड येथील रुरकीमधील एका महाविद्यालयात लेक्चररच्या रुपात अनुराधा यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. यासोबत त्या युपीएससी परीक्षेचा अभ्यासही करत होत्या. आपली कोचिंग फी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ट्यूशन देखील अनुराधा घ्यायच्या.
पहिल्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास पण....
वर्ष 2012 मध्ये पहिल्याच प्रयत्नात अनुराधा यांनी युपीएससीची परीक्षेत यश मिळवले होते. पण त्यावेळी अनुराधा यांची ऑल इंडिया रँक 451 होती. पण युपीएससीची परीक्षेची अधिक उत्तमपणे तयारी करण्यासाठी अनुराधा यांनी दिल्लीत निर्वाण आयएएस अॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला.
दुसऱ्या प्रयत्नात 62 वा रँक
अनुराधा यांनी पुन्हा युपीएसएसी परीक्षेची तयारी करून 62वा रँक मिळवला.
दंडाधिकाऱ्यांच्या रुपात कार्यरत
सध्या अनुराधा उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या रुपात कार्यरत आहेत.
आणखी वाचा :