सार

देशातील प्रत्येक 5 पैकी 3 महिला अ‍ॅनिमियाचा सामना करत आहे. ही समस्या अशावेळी होते जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात लाल रक्त कोशिका किंवा हिमग्लोबीन कमी होते.

Anaemia Symptoms : लाइफस्टाइल आणि चुकीची खाण्यापिण्याची सवय यामुळे सध्या आरोग्यासंबंधित काही समस्या मागे लागल्या जातात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांमध्ये अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवत असल्याचे आढळून येते. आरोग्य तज्ज्ञ असे म्हणतात की, ज्यावेळी महिलांच्या आरोग्याबद्दल बोलले जाते तेव्हा चिंता अधिक वाढू शकते.

आकडेवारी सांगते की, प्रत्येक पाचपैकी तीन महिला अ‍ॅनिमियाचे शिकार आहेत. अ‍ॅनिमिया अशावेळी होतो ज्यावेळी शरीरात पुरेशा प्रमाणात लाल रक्त कोशिका किंवा हिमग्लोबीनची कमतरता निर्माण होते. अ‍ॅनिमिया भले रक्तासंबंधित समस्या आहे पण याचा परिणाम संपूर्ण आरोग्य आणि मानसिक आरोग्यावर पडला जातो.

लक्षणे

अ‍ॅनिमिया झालेल्या व्यक्तींमध्ये थकवा जाणवणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. लोह, व्हिटॅमिन बी-12, फॉलेटच्या कमतरतेमुळे अथवा अनुवांशिक आजारांमुळे तुम्ही अ‍ॅनिमियाचे शिकार होऊ शकतात.

कमी वयातील महिलांनाही अ‍ॅनिमियाची समस्या

महिला रोग तज्ज्ञ म्हणतात की, अल्पवयीन आणि गर्भवती महिलांमध्ये अ‍ॅनिमियाची समस्या अधिक दिसून येते. सर्वसामान्यपणे महिलांमध्ये थकवा, कमजोर वाटणे अशी सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, महिलांच्या जेवणामध्ये लोहाची कमतरता जाणवते. खासकरुन ग्रामीण भागातील महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.

या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका

अ‍ॅनिमियाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वयाच्या 20 व्या वर्षातील तरुणींमध्ये अ‍ॅनिमियाची समस्या दिसून येऊ शकते. यावेळी सतत थकवा जाणवणे, डोकेदुखी, त्वचा पिवळसर होणे, श्वास घेण्यास समस्या आणि हृदयाचे ठोके वाढले जाणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे संकेत आहे.

असा करा बचाव

अ‍ॅनिमियाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करावा. याशिवाय डाएटमध्ये बदल करावा. यावेळी हिरव्या पालेभाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये अशा गोष्टींचा समावेश डाएटमध्ये करावा. याशिवाय आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करू शकता. ज्या व्यक्तींना अ‍ॅनिमियाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अ‍ॅसिडची औषधे घ्यावीत. याशिवाय गर्भवती महिलांनीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)