सध्या वाढत्या पोटावरील चरबीची समस्या सामान्य झाली आहे. खरंतर, बिघडलेली लाइफस्टाइल, अनहेल्दी डाएट आणि शारीरिक हालचाल न केल्याने पोटावर चरबी वाढू लागते.
पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी दररोज दालचिनीच्या पानांच्या पाण्याचे सेवन करा. या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट्, फायबर आणि मेटाबॉलिज्म चरबी कमी करण्यास मदत करतात.
दररोज रात्री दालचिनीच्या पानांचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. याशिवाय वेगाने बेली फॅट बर्न होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीच्या पानांचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
दालचिनीच्या पानांचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले बायोअॅक्टिव्ह कंपाउंड्स फॅट्स बर्न करण्यास मदत करतात.
दालचिनीची पाने धुवून उकळत्या पाण्यात घाला. 5-7 मिनिटांनी गॅस बंद करुन पाणी गाळून प्या. यामध्ये चवीसाठी मध किंवा लिंबाचा रस मिक्स करू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.