सार
गुढीपाडवा आणि हिंदू नवर्षाची सुरूवात 9 एप्रिल पासून होणार आहे. या दिवशी घरोघरी गोडाचे पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या गुढीपाडव्याला घरच्याघरी आम्रखंड कसे तयार कराल याची सोपी रेसिपी पाहूया सविस्तर...
Gudi Padwa 2024 Special Recipe : गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. याशिवाय घरोघरी पंचपक्वान्न तयार केले जातात. याच पंचपक्वान्नापैकी एक म्हणजे आम्रखंड. यंदाच्या गुढीपाडव्याला घरच्याघरी आम्रखंड कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया सविस्तर.
साहित्य
- आंब्याचा रस 100 ग्रॅम
- दही दोन किलो
- पीठी साखर 150 ग्रॅम
- केसर
- वेलची
- पिस्ता 20 ग्रॅम
- आंब्याच्या बारीक फोडी
कृती
- सर्वप्रथम एक स्वच्छ सुती कापड घेऊन त्यामध्ये दही घेत त्यामधील सर्व पाणी काढून टाका. यानंतर दह्याचा चक्का तयार करून घ्या.
- वेलचीची पावडर तयार करा.
- एका भांड्यात दह्याच्या चक्का घेऊन व्यवस्थितीत फेटून घ्या.
- चक्कामध्ये पीठी साखर, वेलची पावडर आणि केसर मिक्स करून पुन्हा फेटून घ्या.
- चक्कामध्ये आता आंब्याचा रस मिक्स करून घट्ट आणि क्रिमी होईपर्यंत फेटून घ्या. अशाप्रकारे आम्रखंड तयार होईल.
- आम्रखंड सजवण्यासाठी त्यावरून केशर, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि आंब्याच्या बारीक फोडी टाका. काही तासांसाठी आम्रखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवल्यानंतर गरमागरम पुरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
आणखी वाचा :
Gudi Padwa 2024 :गुढीपाडव्याला कडूलिंब आणि गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घर खरेदी का करतात माहिती आहे का?
गुढी पाडव्याला सेलेब्रिटींसारखा असा करा मराठमोठा लुक, दिसाल सुंदर