अभिनेत्री प्रिया बापटसारखा लुक यंदाच्या गुढी पाडव्याला करू शकता. केशरी रंगातील साडीवर कॉन्ट्रस्ट रंगातील ब्लाऊज सुंदर दिसते. याशिवाय साडीवर चोकर ज्वेलरीही उठून दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
पारंपरिक साज
प्राजक्ता माळीसारखा लुक गुढी पाडव्याला रिक्रिएट करू शकता. सध्या एथनिक ज्वेलरीचा ट्रेण्ड आहे. यामुळे प्राजक्तासारखा पारंपारिक साज तुम्हाला हटके लुक देईल.
Image credits: Instagram
Marathi
मोत्याची ज्वेलरी
गुढी पाडव्याला मोत्याची ज्वेलरी साडीवर सुंदर दिसते. अभिनेत्री सोनालीसारखा लुक रिक्रिएट करण्यासाठी तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही रंगाची साडी नेसा. यावर मोत्याची ज्वेलरी आणि नथ घाला.
Image credits: Instagram
Marathi
सईचा लुक करू शकता रिक्रिएट
गुढी पाडव्याला सई ताम्हणकरसारखा लुक रिक्रिएट करू शकता. जांभळ्या रंगातील साडीवर गोल्डन रंगातील ज्वेलरी आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा घालू शकता.
Image credits: Instagram
Marathi
गुढी पाडव्याच्या पुजेसाठी लुक
अपूर्वा नेमळेकरसारखा लुक तुम्ही गुढी पाडव्याच्या पूजेसाठी करू शकता. अपूर्वा पिच रंगातील साडीत फार सुंदर दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
हिरव्या साडीतील लुक
उर्मिला निबांळकरसारखी हिरव्या रंगातील साडी कोणत्याही सणासाठी बेस्ट पर्याय आहे. या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊजही सुंदर दिसेल.