परफ्यूम लावल्यानंतरही शरिरातून निघणाऱ्या घामामुळे दुर्गंधी येते? नक्की फॉलो करा या टिप्स

| Published : May 22 2024, 08:55 AM IST

Body Odor Remedies
परफ्यूम लावल्यानंतरही शरिरातून निघणाऱ्या घामामुळे दुर्गंधी येते? नक्की फॉलो करा या टिप्स
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजण घामाच्या दुर्गंधीमुळे त्रस्त होतात. खरंतर ही एक समस्या झाली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. जेणेकरुन घामामुळे येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.

Body Odor : उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे सर्वसामान्य बाब आहे. पण चारचौघात गेल्यानंतर घामाच्या दुर्गंधीमुळे लाज वाटते. बहुतांशजणांना शरिरातून निघणाऱ्या घामाची दुर्गंधी येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसात शरिराचे तापमान वाढले जात असल्याने घाम अत्याधिक प्रमाणात येतो. यावेळी घामामुळे शरिराला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी बॉडी डिओ अथवा परफ्युमचा वापर केला जातो. या गोष्टींचा वापर करून देखील घामामुळे येणारी दुर्गंधी दूर होत नाही? अशातच पुढील काही टिप्स नक्कीच तुमची मदत करतील. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

लिंबूचा वापर
तुमच्या अंडरआर्म्समधून अधिक दुर्गंधी येत असल्यास लिंबूचा वापर करू शकता. यासाटी एक लिंबूचा तुकडा घेऊन 15 मिनिटे अंडरआर्म्स येथे घासा. यानंतर थंड पाण्याने अंडरआर्म्स स्वच्छ धुवा. अशातच लिंबूचा मदतीने अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.

लिंबू आणि बेकिंग सोडा
घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाछी एका वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस मिक्स करा. तयार केलेली पेस्ट अंडरआर्म्स येथे 20 मिनिटे लावून ठेवत स्वच्छ पाण्याने धुवा.

गुलाब पाण्याचा वापर
घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करू शकता. या स्प्रे बॉटलमध्ये गुलाब पाणी भरून ते अंडरआर्म्सच्या येथे दररोज स्प्रे करत जा. यामुळे कालांतराने अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.

सूती कपडे परिधान करा
उन्हाळ्याच्या दिवसात शरिरातून अत्याधिक प्रमाणात घाम निघत असल्यास घट्ट कपडे परिधान करणे टाळा. यावेळी सूती आणि कॉटनचे कपडे परिधान करा. याशिवाय उत्तम ब्रँडचा परफ्यूमचा वापर करा. जेणेकरुन शरिरातून निघणाऱ्या घामामुळे येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.

तुरटीचा वापर
आंघोळ करताना तुरटीच्या पाण्याने करा. यामुळे शरिरातून येणाऱ्या दुर्गंधीपासून दूर राहण्यास मदत होईल. याशिवाय अंडरआर्म्सच्या येथे तुरटी 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळेही घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहता येईल.

या गोष्टींची घ्या काळजी
उन्हाळ्याच्या दिवसात शरीर दररोज स्वच्छ ठेवण्याकडे अधिक लक्ष द्या. दिवसातून दोन वेळेस आंघोळ करू शकता. कडक उन्हातून घराबाहेर पडणे टाळा आणि अत्याधिक तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यावेळी हेल्दी डाएटची मदत घ्यावी. याशिवाय दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी जरुर प्या. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होईल आणि दुर्गंधी येण्याची समस्याही कमी होईल. तणावामुळेही शरिरातून अत्याधिक घाम निघाल्यानंतर दुर्गंधी येऊ शकते. यामुळे वरील काही टिप्स फॉलो करून घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीपासून दूर राहू शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर

अत्याधिक प्रमाणात आंबे खाता का? आरोग्यासंबंधित उद्भवतील या 5 समस्या