अत्याधिक प्रमाणात आंबे खाता का? आरोग्यासंबंधित उद्भवतील या 5 समस्या

| Published : May 20 2024, 11:59 AM IST

Mangoes

सार

Side effects of mango : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होण्यासह खाल्लेही जातात. पण अत्याधिक प्रमाणात आंब्याचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

Side effects of mango : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर सीझनल फळांची आवक वाढली जाते. यापैकीच एक फळ म्हणजे आंबा. आंबा खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. खरंतर, आंबा आपल्या चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे कितीही आंबे खाल्ले तरीही ते कमी खाल्ल्यासारखेच वाटतात. पण आंबे अत्याधिक प्रमाणात खाणे टाळावे असाही आरोग्य तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो.

आंबा खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
आंबा खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अत्याधिक प्रमाणात आंबा खाल्ल्याने आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आंब्याची चवच नव्हे तर यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, पोटॅशिअम आणि फायबरचे प्रमाणही अत्याधिक असते. सर्वसामान्यपणे, आंब्यामध्ये 100 ग्रॅम कॅलरीज असतात.

अत्याधिक प्रमाणात आंबे खाल्ल्याने होणारे नुकसान

पचनासंबंधित समस्या
अत्याधिक प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पोट फुगणे, पोटात गॅस होणे अथवा अतिसारचीही समस्या उद्भवू शकते.

वजन वाढणे
आंब्यामध्ये कॅलरीज अत्याधिक असतात. यामुळे आंब्याचे अत्याधिक सेवन केल्याने वजन वाढू शकते. आंबा चवीने गोड असला तरीही तो मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा शरिरात कॅलरीजचे प्रमाण वाढले गेल्यास वजनही वाढू शकते.

अ‍ॅलर्जीसंबंधित समस्या
अत्याधिक प्रमाणात आंब्याचे सेवन केल्यास अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. यामुळे खाज, सूज येणे, अंगावर पित्त उटणे अशा समस्या उद्भवू शकता. आंब्याचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यानंतर अशी काही लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना भेटा.

रक्तातील साखर वाढू शकते
आंब्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स अत्याधिक असते. म्हणजेच आंब्याचे अत्याधिक सेवन केल्यास रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेह रुग्णांनी आंब्याचे कमी प्रमाणात सेवन करावे. याशिवाय आंबा खाल्ल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करावा.

पिंपल्सची समस्या
आंब्याचे अत्याधिक सेवन केल्याने पिंपल्सची समस्या वाढू शकते. आंबा गरम असतो असे मानले जातो. यामुळेच त्वचा हेल्दी राहण्यासाठी आंब्याचे अत्याधिक सेवन करू नये.

एका दिवसात किती आंबे खाऊ शकता?
एकावेळी संपूर्ण आंबा खाण्याऐवजी अर्धा आंबा खाणे योग्य आहे. आंब्यामध्ये फ्रुक्टोज असते यामुळे ब्लड शुगर वाढली जाते. याचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. अथवा अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवल्यास डॉक्टरांची भेट घ्यावी.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

उन्हाळ्यात पोटात उष्णता जाणवते? करा या 5 गोष्टींचे सेवन, मिळेल आराम

कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेलं? या 4 टिप्सने ओखळा