सार
सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स ते ट्रिटमेंट केल्या जातात. पण काहीजण घरगुती उपायांनी त्वचेला ग्लो येण्यासाठी काही उपाय करतात. अशातच थंडीत चेहरा उजळ दिसण्यासाठी ग्लिसरीनचा कशाप्रकारे वापर करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Glycerin in Winter : थंडीच्या दिवसात त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते. यामुळे हातापायांना भेगा पडण्यासह चेहरा काळवंडलेला दिसतो. याशिवाय अन्य काही समस्यांचाही सामना करावा लागतो. अशातच थंडीत ग्लिसरीनचा वापर चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणत्या 5 पद्धतीने वापर करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई ऑइल
मऊसर त्वचेसासाठी ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई चे मिश्रण बेस्ट उपाय आहे. यासाठी एक चमचा ग्लिसरीनमध्ये दोन थेंब व्हिटॅमिन ई तेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला किंवा हातापायाला लावून मसाज करा. यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होईल.
कच्चे दूध आणि ग्लिसरीन
कच्चे दूध चेहरा आणि त्वचेसाठी अधिक फायदेशीर असते. थंडीत त्वचा उजळ दिसण्यासाठी दूध आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला 10 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
ग्लिसरीन आणि मध
थंडीत त्वचेच्या क्लिंजींगसाठी ग्लिसरीन आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी अर्धा चमचा ग्लिसरीनमध्ये अर्धाच चमचा मध मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट सकाळी किंवा संध्याकाळी चेहऱ्याला लावा.
हेही वाचा : चेहऱ्यावर 10 मिनिटांत येईल ग्लो, ट्राय करा हे घरगुती उपाय
ग्लिसरीन आणि लिंबाचा रस
थंडीत चेहऱ्यावर खूप बॅक्टेरिया आणि किटाणू जमा होतात. यामुळे त्वचेची काळजी घेण्यासह त्वचा उजळ दिसण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी दोन चमचे ग्लिसरीनमध्ये अर्धा लिंबाचा रस मिक्स करुन पेस्ट तयार करा.
ग्लिसरीन आणि गुलाब पाणी
ग्लिसरीनचा वापर नेहमीच बॉडी लोशनच्या रुपात केला जातो. त्वचा मऊसर राहण्यासाठी गुलाब पाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवा. आंघोळीनंतर बॉटलमधील स्प्रे चा संपूर्ण त्वचेसाठी वापर करू शकता.
या टाइपच्या त्वचेसाठी करा ग्लिसरीनचा वापर
ग्लिसरीनचा वापर प्रत्येक त्वचेसाठी केला जाऊ शकतो. यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते.
- कोरडी त्वचा
- तेलकट त्वचा
- संवेदनशील त्वचा
- पिंपल्स आलेली त्वचा
आणखी वाचा :
शेव्हिंगनंतर पुरुषांनी अवश्य कराव्यात या ४ गोष्टी! रॅशेस, खाज, जळजळ होणार नाही
किचनमधील या 5 वस्तूंमुळे कमी होईल केसगळतीची समस्या, आजच करा उपाय