किचनमधील काही वस्तूंमुळे केसगळतीची समस्या कमी होऊ शकते. याबद्दलच पुढे जाणून घेऊया…
नारळाचे तेल केसगळतीच्या समस्येवर फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल तत्त्व असल्याने केसगळतीची समस्या कमी होईल.
आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्यासह केसांनाही फायदा होतो. याशिवाय केस पांढरे होण्याच्या समस्येपासूनही दूर राहता.
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर असल्याने केस मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय केसांना चमक येते.
दही केसांवर कंडीशनरप्रमाणे काम करते. यामुळे केसगळतीच्या समस्येवर दह्याचा वापर करू शकता.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. केसगळतीच्या समस्येवर लिंबाचा रस केसांवर लावू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.