चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रिटमेंट केल्या जातात. पण पुढील काही घरगुती उपाय करुन चेहऱ्यावर 10 मिनिटांत ग्लो येण्यास मदत होईल.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी स्टिम घेणे फायदेशीर मानले जाते. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील पोर्स ओपन होत त्वचा आतमधून स्वच्छ होते. यामुळे चेहरा फ्रेशही दिसतो.
चेहऱ्याला चमक येण्यासाठी आठवड्यातून 1-2 वेळा स्टिम घेऊ शकता.
चेहऱ्याला बेसन-हळदीचा फेसपॅक लावल्याने त्वचेला ग्लो येतो. याशिवाय त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते.
लिंबाचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेवरील डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. यासाठी लिंबाचा रस गुलाब पाणी किंवा पाण्यात मिक्स करुनच चेहऱ्याला लावा.
चेहऱ्याला लिंबाचा रस थेट लावू नका. कारण लिंबूमध्ये असणाऱ्या अॅसिडमुळे त्वचा काळवंडली जाऊ शकते.
एलोवेरा जेल त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. कोरड्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करू शकता. याशिवाट अँटी-एजिंगची लक्षणेही कमी करण्यास मदत होते.
चेहऱ्याला एलोवेरा जेल लावल्याने त्वचा मऊसर आणि हाइड्रेट राहते. याशिवाय त्वचेला ग्लो देखील येतो.
मधामुळे त्वचा मॉइश्चराइज राहण्यास मदत होते. यामध्ये असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल तत्त्वांमुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.