सार
थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अन्यथा संक्रमित आजारांना बळी पडण्याची शक्यता अधिक वाढली जाते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात पालक कोणत्या चुका करतात याबद्दल अधिक...
Parenting Tips : संपूर्ण भारतात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 डिग्री सेल्सियसपेक्षाही खाली उतरला आहे. थंडीच्या दिवसात वयोवृद्धांसह घरातील लहान बाळाची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. कारण या काळात आरोग्यासंबंधित समस्या अधिक वाढल्या जातात. जाणून घेऊया लहान मुलांबद्दल पालकांनी थंडीच्या दिवसात कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे.
सर्दी-खोकल्याच्या कारणास्तव लसीकरणार उशीर
थंडीच्या दिवसात थंड वारे वाहत असल्याने लहान मुलांना लगेच सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवते. यामुळे काही आई-वडील आपल्या लहान मुलांना लसीकरणासाठी नेण्यास टाळतात किंवा उशीर करतात. खरंतर, सर्दी-खोकल्याच्या कारणास्तव गरज भासल्यास लहान मुलाचे लसीकरण वेळीच करावे. याशिवाय डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.
हेही वाचा : मुलांसोबतचे नाते मजबूत करायचे आहे? रात्री ८ वाजता करा हे काम!
लहान मुलांची आंघोळ
थंडीच्या दिवसात बहुतांश पालक त्यांच्या लहान मुलांना सर्दी-खोकला किंवा ताप येईल म्हणून आंघोळ घालणे टाळतात. मुलांना आंघोळ घालणे महत्वाचे आहे. यामुळे बाळ स्वच्छ राहण्यासह त्याच्यापासून किटाणू दूर राहतील. याशिवाय थंडीच्या दिवसात लहान मुलांना आंघोळ घालण्यासाठी कोमट गरम पाण्याचा वापर करावा.
मॉइश्चराइजर न लावणे
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचेवर खाज येणे, रॅशेज किंवा जळजळची समस्या उद्भवू शकते. यामुळे थंडीच्या दिवसात मुलांना देखील मॉइश्चराइजर लावावे. जेणेकरुन त्वचा मऊसर राहण्यास मदत होईल. याशिवाय नारळाच्या तेलाचाही वापर मॉइश्चराइजर म्हणून लहान मुलांसाठी करू शकता.
आणखी वाचा :
प्रेग्नेंसीमध्ये वर्किंग वुमनने अशी घ्या आरोग्याची काळजी, बाळही राहील सुदृढ
ऑफिसच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी फॉलो करा हे डेली रुटीन, रहाल टेंन्शन फ्री