सार
प्रेग्नेंसीचा काळ प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वाधिक सुंदर क्षणांपैकी एक असतो. यावेळी शरिरात काही बदलावासह भावनांमध्येही चढउतार झाल्याचे दिसून येतो. अशातच वर्किंग वुमनने प्रेग्नेंसीच्या काळात आरोग्याची कशी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Health Care During Pregnancy : प्रेग्नेंसीच्या काळात महिलांनी आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. यावेळी महिलेच्या शरिरात होणाऱ्या बदलावामुळे मूड स्विंग्स होण्याची फार शक्यता असते. अशातच पोटातील बाळासह स्वत:ची वर्किंग वुमनने काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
आराम करा
प्रेग्नेंसीमध्ये काही शारिरीक बदल होतात. यामुळे महिलेला थकवा, मळमळ आणि अन्य समस्यांचा सामना करावा लावू शकतो. अशातच प्रेग्नेंसीमध्ये महिलेने आराम करावा. काम करताना थोडावेळ ब्रेकही घ्यावा. जेणेकरुन थकवा दूर होण्यास मदत होईल. कामादरम्यान पाणी प्यावे. याशिवाय अत्याधिक थकवा येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
वेळेचे नियोजन
वर्किंग वुममने प्रेग्नेंसीवेळी कामाच्या वेळेचे नियोजन करावे. कामावेळी प्राथमिकता कोणत्या गोष्टींना द्यावी हे पहावे. याशिवाय कामाचा अधिक ताण स्वत:वर पडणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी काम वाटून द्यावे. याशिवाय स्वत:साठी वेळ काढावा. जेणेकरुन मानसिक आणि शारिरीक रुपात हेल्दी राहण्यास मदत होईल.
कामाच्या ठिकाणचे वातावरण
वर्किंग वुमनने कामाच्या ठिकाणी आपल्या सुरक्षिततेसह आरोग्याचीही काळजी घ्यावी. तुम्ही करत असलेल्या कामात शारिरीक रुपात अधिक थकवा येत असल्यास याबद्दल विचार करा. यासाठी तुमच्या वरिष्ठांची बोला आणि कामात थोडा बदल करुन घ्या.
हेही वाचा : महिलांनी शरिरातील हार्मोन संतुलित राहण्यासाठी खा हे 7 फूड्स
हेल्दी डाएट फॉलो करा
प्रेग्नेंसीमध्ये हेल्दी आहाराचे सेवन करावे. संतुलित आहारामुळे शरिराला उर्जा मिळण्यासह पोटातील बाळाचा योग्य प्रकारे विकास होण्यास मदत होते. डाएटमध्ये लोह, प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय हाइड्रेट राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
वर्किंग वुमनने प्रेग्नेंसीदरम्यान शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. कामाचा ताण येऊन मानसिक आरोग्य बिघडले जाणार नाही याची काळजी घ्यावी. कामामुळे तणाव, एंग्जायटीची समस्या उद्भवत असल्यास योगा, मेडिटेशन करा.
हेल्थ चेकअप करा
प्रेग्नेंसीमध्ये एका निश्चित वेळानंतर हेल्थ चेकअप करावे. जेणेकरुन तुमच्या आरोग्यासह बाळाच्या विकासाच्या दृष्टीने काही गोष्टी करता येतील.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :