सचिन तेंडुलकर यांचा एकुलता एक मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा सानिया चांधोक हिच्यासोबत साखरपुडा झाला आहे. कुटुंबीयांनी मात्र याची अधिकृत माहिती दिलेली नाही.
मुंबई : लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात लवकरच महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पैठणी साड्या तेथील पर्यटकांना पाहण्यास मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात सेनापती रघुजी भोसले प्रथम यांची तलवार १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राला परत मिळणार आहे.
मुंबईत एका नवऱ्याची चक्क बायकोकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेचा उघड आरोपी महिलेच्या मुलीनेच केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
भारताचे टेनिस स्टार लिअँडर पेस यांचे वडील व्हेस पेस यांचे आज निधन झाले. हॉकी संघाकडून कांस्यपदक जिंकण्यासोबतच ते क्रीडा वैद्यकशास्त्रात तज्ज्ञ होते. त्यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अभिनेत्री शिल्पा शेट्टी, उद्योगपती राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीवर त्यांच्या बंद पडलेल्या कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित कर्ज-गुंतवणूक व्यवहारात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर सिनेमा ‘वॉर-2’ नुकतान सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच सिनेमाला सुरुवातीला प्रेक्षकांची गर्दी दिसण्यासह आता त्याबद्दल संमीश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
मुंबई - १६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या दिवशी बुध, गुरु, शुक्र आणि शनि या ग्रहांचा असा सुंदर योग जुळणार आहे की तीन राशींचे नशीब खुलणार आहे. या राशींसाठी जन्माष्टमी खूप भाग्यवान ठरू शकते.
मुंबई उच्च न्यायालयाकडून दादर आणि गिरगाव येथे कबुतरांना खाद्य देण्याप्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. खरंतर, कबुतरांमुळे आरोग्याला धोका असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या.
मुंबईत पावसाच्या जोरदार सरी मध्यरात्रीपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अशातच हवामान खात्याने यल्लो अलर्ट शहरासाठी जारी केला आहे.
मुंबई - आज १४ ऑगस्टच्या बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घ्या. आजच्या प्रमुख घडामोडी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.