FASTag:आता एका वाहनासाठी एकच फास्ट टॅग, देशभरात 'एक वाहन एकच फास्टॅग'

| Published : Apr 02 2024, 06:14 PM IST

fasttag deadline

सार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चा 'एक वाहन, एक फास्टॅग' हा नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका वाहनाशी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा यामागील उद्देश आहे.

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चा 'एक वाहन, एक फास्टॅग' हा नियम सोमवारपासून देशभरात लागू करण्यात आला आहे. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका वाहनाशी अनेक फास्टॅग जोडणे यावर आळा घालण्यासाठी या नवीन फास्ट टॅग प्रणाली अस्तित्वात आणली आहे.

आता एका वाहनावर एकापेक्षा जास्त फास्टॅग लावता येणार नाहीत. ज्यांच्याकडे एका वाहनासाठी अनेक फास्टॅग आहेत ते १ एप्रिलपासून ते वापरू शकणार नाहीत. एनएचएआयने पेटीएम फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली होती.

एकच फास्टॅग का?

इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी एनएचएआयने 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रम सुरू केला आहे. - एकापेक्षा अधिक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरण्यास बंदी घालणे आणि एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

फास्टॅग कसे काम करते?

फास्टॅग ही भारतातील टोल संकलनाची इलेक्ट्रॉनिक प्रणाली असून, ती एनएचएआयकडून चालविली जाते. फास्टॅगमध्ये थेट टोल मालकाशी जोडलेल्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून थेट टोल पेमेंट करण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञान वापरले जाते

फास्टॅग काय आहे?

पथकर वसुली करणारी केंद्रे अथवा टोल प्लाझावरील गर्दी आणि वाहनांची लांबलचक रांग लागणे टाळण्यासाठी सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील पथकर वसुली सर्व मार्गिका ‘फास्टॅग लेन’ म्हणून घोषित करणे बंधनकारक केले आहे. फास्टॅग - FASTag ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे चालविली जाते. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर आधारित, फास्टॅग वाहनांच्या विंडस्क्रीनवर चिकटलेला असतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, फास्टॅग हे टोल वसुलीसाठी प्रीपेड आणि रिचार्ज करण्यायोग्य खूणचिठ्ठी - टॅग आहे. फास्टटॅगला कोणतीही मुदत समाप्तीची तारीख नसते, म्हणून, जोपर्यंत ते कोणत्याही छेडछाड अथवा विद्रुपीकरणाविना व्यवस्थित असते आणि टोल प्लाझावर वाचले जाऊ शकते तोपर्यंत त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

आणखी वाचा :

तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट

Rules Change from 1st April : पॅन कार्ड आधारला लिंक ते फास्टॅगच्या नियमात बदल, आजच करा हे काम

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर