सार

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे. 

भाजपने या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून नवीन उमेदवारांना तिकीट जाहीर केलं आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने पूनम महाजन या दोन टर्म खासदार असलेल्या उमेदवाराला तिकीट नाकारले असून येथून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केले आहे. काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर केले आहे. वर्षा गायकवाड यांच्या विरोधातील लढाई कशी होईल याबाबत उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले आहे. 

उज्ज्वल निकम काय म्हटले? 
उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी वर्षा गायकवाड यांच्या विरोधात ते कोणती स्ट्रॅटेजी वापरणार यावर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं की, मी न्यायालयात असताना समोरच्याला कधी कमी लेखलं नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड या वरिष्ठ आणि धुरंधर राजकारणी असल्याची पूर्ण कल्पना असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. 

पुढे उज्ज्वल निकम म्हणतात की, मला यावर आज राजकीय भाष्य करता येणार नाही. उमेदवारी न मिळालेल्या खासदारांना पक्षनेञत्वाच्या मनात त्यांच्यावर चांगली जबाबदारी देण्याची इच्छा असू शकते. प्रत्येक गोष्टीतून चुकीचा अर्थ काढू नये. न्यायालयात कायद्याची लढाई खेळत होतो. पण मी आणि माझा पक्ष याची वकिली जनतेच्या दरबारात करणार आहे, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. 

देशाची प्रतिमा उंचावण्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांचे - 
देशाची प्रतिमा उंचावण्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांचे आहे. मला जी जागा लढवण्यासाठी दिली आहे ती महत्वाची आहे. मनोहर जोशी यांनी ही जागा लढवली होती. माझा हा प्रयत्न असेल की आपल्या लोशाहीचे उदाहरण हे जगात दिले जाते. मी देशात चांगले कायदे येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिले आहे. 
आणखी वाचा - 
शरद पवारांचा 'निष्ठावंत' लागणार देवेंद्र फडणवीसांच्या गळाला? सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसणार मोठा धक्का
कोण आहेत उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून तिकीट जाहीर