Ayodhya Ram Mandir : जय श्री रामाच्या जयघोषात 108 फूट लांब अगरबत्ती केली प्रज्वलित, अयोध्येत दीड महिने दरवळणार सुगंध

| Published : Jan 17 2024, 03:35 PM IST / Updated: Jan 18 2024, 11:12 AM IST

incense stick

सार

Ayodhya Ram Mandir : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यांनी गुजरातमधून अयोध्येमध्ये पाठवण्यात आलेली 108 फूट लांबीची अगरबत्ती प्रज्वलित केली.  

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातहून अयोध्येमध्ये 108 फूट लांब अगरबत्ती (Incense Stick) पाठवण्यात आली होती. 

ही सुगंधीत अगरबत्ती मंगळवारी (16 जानेवारी 2024) अयोध्येत पोहोचली. यावेळेस श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यांनी 108 फूट लांब अगरबत्ती (Incense Stick) प्रज्वलित केली.

ज्यावेळेस महंतांनी अगरबत्ती प्रज्वलित केली, त्यावेळेस रामभक्तांनी जय श्री राम नामाचा जयघोष केला. यावेळेस महंत दास म्हणाले की, “अगरबत्तीचा सुगंध 50 किलोमीटर अंतरापर्यंत दरवळेल आणि पुढील 45 दिवस अगरबत्ती प्रज्वलित राहील”.

एका अनोख्या विधीकरिता ही अगरबत्ती (Incense Stick) गुजरातमधील वडोदरा येथून अयोध्येत पाठण्यात आली आहे. या अगरबत्तीचे वजन 3 हजार 610 किलो इतके आहे, तर रुंदी अंदाजे साडेतीन फूट असल्याचे म्हटले जात आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी शेण, तूप, फुलांचे अर्क आणि औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.

108 फूट लांब अगरबत्ती अशी तयार करण्यात आली, पाहा व्हिडीओ

View post on Instagram
 

अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये येत्या 22 जानेवारी रोजी रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-परदेशातील पाहुणेमंडळी देखील उपस्थिती दर्शवणार आहेत.

आणखी वाचा

Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीपर्यंत करतील केवळ फलाहार, या नियमांचं करताहेत पालन

Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?

VIRAL VIDEO : जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने गायले राम भजन, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प

Read more Articles on