सार

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी रामभक्तांनी असे कित्येक संकल्प केले होते, जे कल्पनेपलीकडील आहे. असाच एक संकल्प मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी केला होता. जे आज ‘मौनी बाबा’ या नावाने ओळखले जातात.

Ram Mandir Ayodhya : मध्य प्रदेशातील दतिया शहरातील एका रामभक्ताने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मोठा संकल्प केला होता. जोपर्यंत राम मंदिराची उभारणी होत नाही, तोपर्यंत बोलणार नाही, असा निश्चय या व्यक्तीने केला होता. यामुळे आज ते ‘मौनी बाबा’ या नावाने ओळखले जात आहेत.

मौनव्रतासह सर्वत्र अनवाणीच प्रवास करण्याचेही त्यांनी ठरवले होते. राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या कारसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. त्यामुळे आता राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनाही आमंत्रित करण्याकरिता फोन येणार आहे की नाही? याची वाट ते पाहत आहेत.

22 जानेवारीपासून करणार रामनामाचा जप

मौनी बाबा 22 जानेवारी 2024 रोजी राम नामाचा जप करून आपले मौनव्रत सोडणार आहेत. मौनी बाबा सध्या मध्य प्रदेशातील दतिया शहरामध्ये अनवाणी भ्रमंती करत आहेत. राम मंदिराची उभारणी झाल्याने ते आता 22 जानेवारीला चपलांचाही वापर करतील. राम मंदिराकडून सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी फोन येईल अशी त्यांना आशा आहे. यासाठी ते दररोज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन याबाबत विचारपूस करतात. यासाठी त्यांनी अर्जही देखील दाखल केला आहे.

पाटीवर लिहून देतात उत्तरे

मौनी बाबांना कोणी प्रश्न विचारला तर ते त्याचे उत्तर लेखी स्वरुपात देतात. लहान मुले अभ्यासासाठी वापरतात ती पाटी व खडू या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे कायम असतात. याद्वारे लोकांनी विचारलेल्या विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरे देतात.

देशभरात उत्साह

अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याबाबत देशभरातील नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे. हा दिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी नागरिक आपापल्या घरात दिव्यांची रोषणाई करतील. यानिमित्ताने रामभक्तांनी भजन कीर्तनाचे आयोजन करण्याची तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील नागरिकांना 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.  

आणखी वाचा : 

Ramcharitmanas : रामचरितमानसच्या मागणीत मोठी वाढ, छपाईसाठी गीता प्रेसमध्ये दिवसरात्र काम सुरू

नाशिकमधील रोड शो ते काळाराम मंदिरापर्यंत, पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास PHOTO

Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराचे घेतले दर्शन, प्रभू श्री रामाच्या भक्तीत झाले तल्लीन