सार
Ram Mandir Ayodhya : जम्मू-काश्मीरमधील एका विद्यार्थिनीचा राम भजन गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्री राम मंदिराचा (Ram Mandir Ayodhya) भव्यदिव्य उद्घाटन सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभू श्री रामाचे भजन, कीर्तन, भक्तीगीते ऐकायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर अशाच एका राम भजनाचा (Ram Bhajan) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जम्मू - काश्मीरमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनी राम भजन (Ram Bhajan) गात असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे भजन तिने स्थानिक पहाडी भाषेमध्ये गायले आहे. सोशल मीडियावरील युजर्संकडून या व्हिडीओवर लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडण्यात येत आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या तरुणीचे नाव बतूल झेहरा (Batool Zehra) असे आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिने प्रभू श्री राम यांच्यावर आधारित भजन (Ram Bhajan) गायले आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही स्तुती करत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
देशभरात उत्साहाचे वातावरण
22 जानेवारी रोजी देशातील नागरिक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. या दिवशी अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यामुळे रामभक्तांमध्ये उत्साह वाढला आहे. रामभक्त आपापल्या पद्धतीने मनातील उत्साह, भावना, प्रभू श्री रामाप्रतिची भक्ती व्यक्त करताना दिसत आहेत.
या सोहळ्यासाठी देशपरदेशातील पाहुणे मंडळी उपस्थिती दर्शवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दिवशी नागरिकांना दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा :
Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प
नाशिकमधील रोड शो ते काळाराम मंदिरापर्यंत, पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास PHOTO
Ramcharitmanas : रामचरितमानसच्या मागणीत मोठी वाढ, छपाईसाठी गीता प्रेसमध्ये दिवसरात्र काम सुरू