उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात अग्नितांडव, गर्भगृहात आग लागल्याने 13 पुजारी जखमी

| Published : Mar 25 2024, 10:38 AM IST / Updated: Mar 25 2024, 10:40 AM IST

Ujjain mahakaleshwar

सार

मध्य प्रदेशातील उज्जैन महाकालेश्वर मंदिरात आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 13 पुजारी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Ujjain Fire : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) आग लागल्याने कमीतकमी 13 पुजारी जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. घटना सोमवारी (25 मार्च) होळीनिमित्त करण्यात येणाऱ्या भस्म आरतीवेळी घडली आहे.

रिपोर्ट्सनुसार, गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आग लागली. यावर उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी म्हटले की, जमखी पुजारींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

भस्म आरती करताना घडली दुर्घटना
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात आग लागल्याच्या घटनेवेळी भस्म आरती सुरू होती. भस्म आरतीवेळी गुलाल उडवला असता आगीने पेट घेतला. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय आग लागल्यानंतर आरतीसाठी भाविक देखील उपस्थितीत होते. सर्वजण होळी खेळत होते. त्यावेळीच मंदिरात आरती करत असलेल्या पुजाऱ्यांवर एकाने गुलाल उडवला असता आग लागली गेली.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न
आग लागल्याने जखमी झालेल्या मंदिरांच्या सेवकाने सांगितले की, गुलाल मंदिराच्या गर्भगृहातील भिंतीवर उडू नये म्हणून पोस्टर्स लावण्यात आले होते. आग लागल्यानंतर पोस्टर जळाले. यानंतर तातडीने आग विझवण्यासाठी काम सुरू केले.

आणखी वाचा : 

होळी उत्सव साजरा करणाऱ्या युवकांनी मुस्लिम महिलांचा केला छळ, व्हिडीओमधील एका व्यक्तीला केली अटक

उत्तर प्रदेशातील मथुरेत डान्स करताना रशियन बार गर्ल्सचा व्हिडीओ झाला व्हायरल, काय होणार कारवाई?

ईडी कोठडीतून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अतिशी मार्लेना यांना कोणते आदेश दिले ?