सार
दिल्लीचे मुक्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ईडी कोठडीतूनही कामकाज सुरु आहे. त्यांनी जल मंत्री आतिशी मार्लेना यांना पाणीटंचाई विषयीच्या समस्या उद्भवू नये यासाठी काही आदेश दिले आहेत.
दिल्ली : मद्य धोरण प्रकरणातील कथित १०० कोटींचा घोटाळा केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी आज सकाळीच ईडीच्या कोठडीतून एक आदेश जारी केला आहे. दिल्लीतील जनतेला उन्हाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, अशा सूचना त्यांनी जलमंत्री आतिशी यांना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तिथे टँकरची व्यवस्था करा, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
अरविंद केजरीवाल हे तुरुंगात राहून सरकार चालवतील असे आपच्या नेत्यांनी म्हंटले होते. तसेच ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे मंत्र्यांनी सांगितले होते. दिल्ली सरकारचा कारभार तुरुंगातूनच पाहणार असलयाचे केजरिएल यांनी आधीच सांगितले. यानंतर लवकरच तुरुंगाबाहेर येऊन दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहे.
ईडी कोठडीतच अरविंद केजरीवाल यांचे कामकाज सुरू
अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीतूनच कामकाज सुरू केल्याचे सांगितले जात आहे. केजरीवाल यांनी जल मंत्रालयाशी संबंधित काही निर्देश जारी केले आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांना केजरीवाल यांनी दिलेल्या निर्देशांबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. यासंदर्भात आतिशी माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, ईडीच्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली.
ईडीकडून कोणतीही चौकशी नाही -
ईडीने कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अटकेत असतानाही चौकशी होईल, याची शाश्वती नाही. कारण ईडीला चौकशी करायची नाही. ईडीला जे करायचे ते करू शकतात. मी पूर्ण तयारी केली आहे. जनतेचा मला पाठिंबा आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले होते.
आणखी वाचा:
राजस्थानमध्ये चालले काय? हत्या करून पाच लोकांना पोलीस स्टेशन जवळ दिले फेकून