उत्तर प्रदेशातील मथुरेत डान्स करताना रशियन बार गर्ल्सचा व्हिडीओ झाला व्हायरल, काय होणार कारवाई?

| Published : Mar 24 2024, 07:36 PM IST

holi mathura

सार

उत्तर प्रदेशात होळीचे सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर होते, तुम्हाला माहित आहे. तर सोशल मीडियावर येथील होळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मथुरा येथे एक रशियन महिला अश्लील पद्धतीने नृत्य करताना दिसून आली आहे.

उत्तर प्रदेशात होळीचे सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर होते, तुम्हाला माहित आहे. तर सोशल मीडियावर येथील होळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मथुरा येथे एक रशियन महिला अश्लील पद्धतीने नृत्य करताना दिसून आली आहे. या व्हिडिओमध्ये इतर लोक दारूचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. 

मथुरेमध्ये दरवर्षी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातील मथुरा, वाराणसी आणि वृंदावन येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीच्या सणासाठी लोक आवर्जून उपस्थित राहतात. येथील होळीच्या सणाचे आपण सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पहिले असतील. पण यावेळी येथील व्हिडिओला वेगळेच स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.

रशियन डान्सर नाचत असताना आजूबाजूची लोक दारूचे ग्लास घेऊन दारू पिताना दिसून आले. त्यामुळे या व्हिडिओवर सोशल मीडिया माध्यम एक्सवरून मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. यामध्ये असणारे लोक डान्स करत असून त्यांना संबंधित ठिकाण हे अध्यात्मिक ठिकाण आहे याचे भान राहिले नसल्याचं दिसून आले आहे. 
आणखी वाचा - 
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा मार्ग लवकरच होणार खुला, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
बहुपत्नीत्वावर बंदी, दोनच अपत्य : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी मुस्लिमांना मूळ रहिवासी होण्यासाठी घातल्या अटी