राजकारणापासून ते मनोरंजनापर्यंत, 19 ऑगस्टच्या टॉप 10 बातम्या

| Published : Aug 19 2024, 07:48 PM IST

top 10 news

सार

या बातम्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, आरोग्य, मनोरंजन आणि गुन्हेगारीच्या बातम्यांचा समावेश आहे. शरद पवारांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे जिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.

  1. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून शरद पवार भडकले, पत्रकारांना विचारला सवाल

मराठा आरक्षणावरील संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून शरद पवार पत्रकारांवर भडकले. भिडे यांनी मराठ्यांना आरक्षण का हवे असा प्रश्न उपस्थित केला होता.

2. काँग्रेसला धक्का? आमदार जिशान सिद्दीकी आज राष्ट्रवादीत जाणार?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो कारण आमदार जिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी आधीच काँग्रेस सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये?, 'लाडकी बहीण' ठरणार कारण?

राज्यात आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर ऐवजी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यताय. यामागे 'लाडकी बहीण' योजनेचा प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा, हा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

4. मुलींनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी, पहा खास क्षणांचे दृश्य

रक्षाबंधनानिमित्त लहान मुलींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली आणि त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनीही या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 5. दिल्लीत भावना गवळींनी PM मोदींना बांधली राखी, त्या काय म्हणाल्यात जाणून घ्या

रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त, आमदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. त्यांनी पंतप्रधान मोदींना देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ म्हणून संबोधले.

6. आरजी कार हॉस्पिटल हत्याकांड: पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये मृत आढळलेल्या महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, तिच्यावर अत्यंत क्रूरतेने हल्ला करण्यात आला होता आणि तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या आहेत.

7. कर्नाटक MUDA जमीन घोटाळा: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची उच्च न्यायालयात धाव

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी MUDA जमीन घोटाळ्यात त्यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

8. मुंबईत म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून लाखोंची फसवणूक, दोन जणांना अटक

मुंबईत म्हाडाच्या घरांच्या लॉटरीच्या अनुषंगाने बनावट वेबसाइट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांकडून लाखो रुपयांची फसवणूक केली.

9. Chhaava Teaser : अंगावर काटा आणणारा विक्कीच्या 'छावा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Chhaava Teaser Out : विक्की कौशलचा आगामी सिनेमा छावाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात विक्की कौशल शूर योद्धाच्या भूमिकेत झळकला आहे. विक्कीचा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

10. War 2 सिनेमाच्या शूटिंग सेटवर ज्युनियर NTR गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

Junior NTR Injured : 200 कोटी रुपयांचे बजेट असणारा वॉर-2 सिनेमाच्या सेटवर अभिनेता ज्युनियर एनटीआरला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. ओपनिंग सीनवेळी ही दुर्घटना घडली आहे.