Loksabha Election 2024 : NDA आघाडीत मनसेचा होणार समावेश? राज ठाकरे यांची अमित शहांसोबत होणार बैठक

| Published : Mar 19 2024, 01:18 PM IST / Updated: Mar 21 2024, 04:00 PM IST

raj thakre

सार

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षांच्या एकमेकांसोबत युती आणि आघाडी होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही दिल्लीत जाऊन पोहचले आहेत. ते महायुतीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षांच्या एकमेकांसोबत युती आणि आघाडी होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही दिल्लीत जाऊन पोहचले आहेत. ते महायुतीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे पोहचले आहेत. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यातील चर्चेचा निकाल येईल हे लवकर कळणार आहे. 

मनसे ‘या’ जागांची करणार मागणी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा या दोन जागांची मागणी करत आहे. आता चर्चेनंतरच राज ठाकरेंची एनडीएमध्ये सहभागी होण्याची मागणी पूर्ण होते की नाही हे समजणार आहे. राज ठाकरे दक्षिण मुंबईमधून माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांना लोकसभेसाठी तिकीट देणार आहे, पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्रातील भाजपचे नेते राहणार उपस्थित 
राज ठाकरेंसोबत यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाचा आतपर्यंत एकही खासदार निवडून आला नसून विधानसभेतही राजू पाटील हे त्यांचे एकमेव आमदार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष निवडून येतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 
आणखी वाचा - 
गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट
पत्नीसोबत शेअर केला अश्लील व्हिडीओ, बंगळुरुतील कोर्टाने पतीला एका महिन्याच्या तुरुंगासह 45 हजार रुपयांचा ठोठावला दंड

Read more Articles on