सार

बंगळुरुतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत मेव्हणाच्या बायकोचा अश्लील व्हिडीओ शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भाऊजीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर स्थानिक कोर्टाने एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Crime News : बंगळुरुतील स्थानिक कोर्टाने एका व्यक्तीला पत्नीसोबत अश्लील व्हिडीओ शेअर केल्याच्या प्रकरणात एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय कोर्टाने व्यक्तीला 45 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

या प्रकरणातील आरोपी व्यक्ती राजाजीनगर येथील एका खासगी कंपनीत काम करतो. याशिवाय पत्नी परदेशात नोकरी करते. या दोघांनी वर्ष 2016 मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता असे या प्रकरणात तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

भाऊजीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाऊजीच्या विरोधात महिलेच्या लहान भावाने पोलिसात तक्रार दाखल करत म्हटले की, त्याने पत्नीचा अश्लील व्हिडीओ बहिणीला पाठवला. या प्रकरणात महिलेने बंगळुरु पोलिसात धाव घेत एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, तपासात असे समोर आलेय आरोपीने अश्लील व्हिडीओ पाठवण्यासह मेव्हण्याच्या पत्नीसाठी अपशब्दांचाही वापर केला आहे.

आणखी वाचा : 

इंदापूर येथील घटना : तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केली गोळ्या झाडून हत्या...

Mumbai Crime : वडाळा येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा महिन्यानंतर पोलिसांना मिळाला मृतदेह, वडिलांनी अपहरण केल्याचा लावला होता आरोप

Crime : बत्ती गुल होण्याच्या भीतीपोटी मुंबईतील नागरिकाने गमावले तीन लाख रुपये, वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर…